Imran Khan : इम्रान खान यांच्‍या अडचणीत वाढ; निवासस्‍थानाला पोलिसांचा घेराव, ४० दहशतवादी लपल्याचा दावा | पुढारी

Imran Khan : इम्रान खान यांच्‍या अडचणीत वाढ; निवासस्‍थानाला पोलिसांचा घेराव, ४० दहशतवादी लपल्याचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी वाढत आहेत. त्‍यांच्‍या लाहोरमधील जमान पार्क निवासस्थानात ४० दहशतवादी लपल्‍याचा दावा पंजाब सरकारने केला आहे. त्‍याच्‍या निवासस्‍थानाला पोलिसांनी घेराव घातला पोलिसांनी वेढा घातला आहे.

पाकिस्‍तानचे माहिती मंत्री आमिर मीर यांनी लाहोरमध्ये सांगितले की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने या दहशतवाद्यांना ताब्यात द्यावे. त्यांनी तसे न केल्यास कायदा आपले काम करेल. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती होती. याबाबत सरकारला अनेक विश्वसनीय गुप्तचर अहवाल प्राप्त झाले होते. हा अहवाल अत्यंत धोकादायक असल्याचे ते म्हणाले. जिओ-फेन्सिंगद्वारे इम्रान खानच्या निवासस्थानी दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे, असेही त्‍यांनी सांगितले. (Imran Khan)

आमिर मीर यांनी इम्रान खान यांच्यावर आरोप करत म्हटले की, इम्रान खान हे मागील एक वर्षाहून अधिक काळ पाकिर्‍स्ंतान लष्कराला लक्ष्य करत आहेत. इम्रान खानला अटक करण्यापूर्वी पीटीआयच्या सर्वोच्च नेतृत्वाने देशात हिंसाचाराचा कट रचला होता. इम्रानच्या अटकेनंतर 9 मे रोजी लाहोरमधील लष्करी प्रतिष्ठानांवर झालेले हल्ले पूर्वनियोजित होते, असेही ते म्‍हणाले.

पंजाब पोलिसांना फ्रीहँड : आमिर मीर

सरकारने ९ मे रोजी होणारे हल्ले आणि हिंसक निदर्शनांची गंभीर दखल घेतली आहे. हंगामी मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांनी पंजाब पोलिसांना जाळपोळ करणाऱ्यांना तोंड देण्यासाठी मोकळीक दिली आहे. कॉर्प्स कमांडर हाऊसवरील हल्ल्यावेळी जाळपोळ करणारे जमान पार्कमधील लोकांच्या संपर्कात होते. हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अमिर मीर यांनी दिला.

Back to top button