मुंबईतील सहा किल्ल्यांचा होणार विकास; लातूरच्या दोन किल्ल्यांना पाच कोटी | पुढारी

मुंबईतील सहा किल्ल्यांचा होणार विकास; लातूरच्या दोन किल्ल्यांना पाच कोटी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील सहा किल्ल्यांचा विकास होणार असून शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहीम या  किल्ल्यांचे रुपडे पालटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या किल्ल्यासह राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण ६० किल्ल्यांचा विकास आाराखडा, असे तीन वेगवेगळे विकास आराखडे तयार केले जाणार आहेत.

या किल्ल्यांचा एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

lok janshakti party : रामविलास पासवानांच्‍या लोक जनशक्‍ती पार्टीचे विभाजन

गड- किल्ल्यासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करीत असताना तो एकत्रितपणे तयार करण्यात यावा. याबरोबरच राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण ६० किल्ल्यांचा विकास आाराखडा, असे तीन वेगवेगळे विकास आराखडे येत्या आठ दिवसांमध्‍ये सादर करण्यात यावेत,असे निर्देश देशमुख यांनी दिले.

#priyanka gandhi : उत्तर प्रदेश पाेलिसांनी गेस्ट हाऊसलाच जाहीर केले जेल

लातूर जिल्हयातील औसा आणि उदगीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील १८ संरक्षित किल्ल्यांसंदर्भात संवर्धनाबाबतची कोणती कामे करण्यात येत आहे, याबाबतचा अहवालही तातडीने तयार करण्यात, असेही देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील एकूण ६० किल्ले राज्य संरक्षित किल्ले म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत आहेत.मात्रअसे असले वित्त विषयक तज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा कसा होऊ शकेल, याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी. या तज्ज्ञ‍ सल्लागारांनी दिलेला अहवाल सरकारला सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button