lok janshakti party : रामविलास पासवानांच्‍या लोक जनशक्‍ती पार्टीचे विभाजन - पुढारी

lok janshakti party : रामविलास पासवानांच्‍या लोक जनशक्‍ती पार्टीचे विभाजन

image=”http://”]नवी दिल्‍ली: पुढारी वृतसेवा[/author]

रामविलास पासवान यांच्‍या निधनानंतर एक वर्षामध्‍येच त्‍यांच्‍या लोक जनशक्‍ती पार्टीचे ( lok janshakti party )  दोन तुकडे पडले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोक जनशक्‍ती पार्टीच्‍या ( lok janshakti party )  दोन गटांना वेगवेगळे पक्ष म्‍हणून मान्‍यता दिली आहे. त्‍याचबरोबर पक्षाचे जुने नाव आणि निवडणूक चिन्‍हही रद्‍द केले आहे.

#priyanka gandhi : उत्तर प्रदेश पाेलिसांनी गेस्ट हाऊसलाच जाहीर केले जेल

दाेन गटाचे झाले दाेन पक्ष

आता यापुढे रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्‍या नेतृत्‍वाखालील पक्षाचे नाव लोक जनशक्‍ति पार्टी ( रामविलास ) असेल तर या पक्षाला हेलिकॉप्‍टर चिन्‍ह देण्‍यात आले आहे. तर रामविलास पासवान यांचे बंधू व चिराग यांचे काका पशुपति कुमार पारस यांच्‍या पक्षाचे नाव राष्‍ट्रीय लोक जनशक्‍ती पार्टी असेल त्‍यांच्‍या पक्षाला शिलाई मशीन हे चिन्‍ह देण्‍यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्‍या या निर्णयामुळे आता लोक जनशक्‍ती पार्टीमधील दोन गटातील वारसदारासाठी सुरु असणार्‍या संघर्षावर पडदा पडला आहे. मात्र चिराग पासवान यांच्‍या पक्षाला रामविलास यांचे नाव जोडले गेले आहेत. त्‍यामुळे आगामी निवडणुकीमध्‍ये रामविलास पासवान यांचा खरा वारसदार अशी घाेषणा करुन ते मतदारांना आवाहन करु शकतात, अशी चर्चा बिहारच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रामविलास पासवान यांच्‍या निधनानंतर चिराग पासवान आणि पशुपति पारस यांच्‍या मतभेद चव्‍हाट्यावर आले होते. यानंतर २०२०मध्‍ये बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्‍ती पार्टीने स्‍वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र सर्वच मतदारसंघात पक्षाचा नामुष्‍कीजनक पराभव झाला होता. यानंतर दोन गटातील मतभेद आणखी तीव्र झाले हाेते.

पशुपति कुमार पारस गटाने चिराग पासवान यांना राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आणि संसदीय दलाचे नेते या दोन्‍ही पदांवरुन हटवले होते. रामविलास पासवान यांचे खरे वारसदार आम्‍हीच आहोत, असा दावा दोन्‍ही गटांकडून गेला जात होता. हा संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत पोहचला. अखेर निवडणूक आयोगाने पक्षाचेच दोन तुकडे करुन मूळ पक्षाचे नाव आणि चिन्‍ह रद्‍द करत दोन नवीन पक्षांना मान्‍यता दिली आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button