chandrapur crime : आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे | पुढारी

chandrapur crime : आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

बऱ्याच महिन्यापासून राज्यातील शाळा सुरू झाल्या. अशा आनंददायी वातावरणात विरजण टाकणारी एक घटना सोमवारी (दि. ४) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात केम तुकुम येथे घडली (chandrapur crime). येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने एका पाचवीच्या वर्गातील मुलीच्या गुप्तांगाला हात लावून अश्लिल चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुंबडे यांनी, वर्गातील इतर मुलींना स्वच्छतेसाठी बाहेर पाठवून पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या गुप्तांगाला हात लावून अश्लिल चाळे केले. शाळेत घडलेला हा प्रकार पीडित मुलीने घरी गेल्यावर पालकांना सांगितल्याने ही घटना उघडकीस आली.

chandrapur crime : अनेक दिवसांपासून कृत्ये करायचा

मुलीच्या सांगण्यावरून पालकांसह गावकरी शाळेत पोहोचले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. म्हणून इतर शिक्षकांनी मुख्याध्यापकांना वर्गात कुलूपबंद करून ठेवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटना्स्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची दक्षता घेतली. चौकशीसाठी मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले असून, मुख्याध्यापक तुंबडे यांचे अशाप्रकारचे चाळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असल्याची माहिती इतर विद्यार्थीनींनी पोलिसांना दिली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाचे कृत्य

विशेष बाब म्हणजे, संशयित मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. सेवानिवृत्तीसाठी अवघे एक वर्ष शिल्लक राहिले आहे. मुख्याध्याकांवर कारवाई करावी. अन्यथा आमच्या स्वाधीन करावे. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. चौकशी अंती अश्लिल चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

Back to top button