जगभरात फेसबुक, व्हॉटस् अॅप, इंन्स्टाग्राम डाऊन; नेटकरी संतापले - पुढारी

जगभरात फेसबुक, व्हॉटस् अॅप, इंन्स्टाग्राम डाऊन; नेटकरी संतापले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावरील प्रसिध्द असणाऱ्या फेसबुक, व्हॉटस् अॅप, इंन्स्टाग्राम हे अॅप जगभरात काहीवेळ डाऊन झाले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांची चांगलीच तारांबळ उठली आहे. या प्लटफॉर्मवरती काहीच अपडेट होत नाही. त्यामुळे अनेक युजरांना याचा फटका बसला आहे.

सोमवारी सायंकाळी ९.३० वाजल्यापासून काहीच अपडेट होत नव्हते. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प होण्यामागे कारणे कोणती होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतात या अॅपचे मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत.

अनेक नेटकऱ्यांनी फेसबुक, व्हॉटस् अॅप, इंन्स्टाग्राम वरती मीम्स बनवून त्या ट्विटर वरती शेअर केल्या आहेत. तर अनेकांनी सोशल यावरती नाराजी व्यक्त केली आहे.

व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक या अॅचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर लोक ट्विट करत सर्वांना अडचणी येत आहेत का? असे प्रश्न विचारत आहेत. काही क्षणात ट्विटरवर या संदर्भात असंख्य ट्विट केले आहेत. यावर अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरती मीम्स शेअर केल्या आहेत.

आर्यन खानचा जुना व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कमेन्टचा पाऊस

हेही वाचलत का?

 

Back to top button