Aryan Khan Drugs Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने शनिवारी मुंबईमध्ये एक हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या छाप्यात ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. रविवारी सायंकाळपर्यंत सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये शाहरुख खाच मुलगा आर्यन खानचा देखील समावेश आहे. आता आर्यननंतर अरबाज सेठ मर्चेंट (Arbaaz Seth Merchantt) हे नाव सातत्याने समोर येतंय. हा Arbaaz Seth Merchantt नेमका आहे तरी कोण? आणि त्याचे आर्यनशी काय नातं आहे?
प्रत्येक स्टारकिड्स पार्टीमध्ये दिसणारा अरबाज हा आर्यन खानच्या जवळचा मित्र आहे. अरबाज एक अभिनेता आहे. अरबाजचे स्टार किड्स आणि इंडस्ट्रीतील लोकांशी चांगले संबंध आहेत. अरबाजचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट आहे. फोटो-शेअरिंग ॲपवर त्याचे जवळपास ३०.५ k फॉलोअर्स आहेत. तसेच ट्विरवर 439 followers आहेत. एनसीबी छाप्यानंतर अरबाज सेठ मर्चेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरबाजला चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसोबत पार्टी करताना पाहण्यात आले होते. दोघांचे एकत्र अनेक फोटो आहेत.
सुहाना खान, शनाया कपूर, अन्नया पांडे, अलाया एफ, आर्यन खान आणि अहान कपूर यासारखे अनेक स्टारकिड्सचा अरबाज जवळचा मित्र आहे. मध्यंतरी, अरबाज हा पूजा बेदीची मुलगी अलाया एफला डेट केल्याचे वृत्त होते.
अरबाजचा जन्म ३० मे, १९९५ रोजी झाला. तो अभिनयाच्या क्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे. तो नेहमी काइली जेनरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या पोस्ट करतो. तसेच तो आवडत्या फुटबॉल स्टार्सच्या बाबतीतही पोस्ट करतो.
एनसीबीच्या टॉपच्या सूत्रांकडून समजतं की, मुंबईमध्ये होणाऱ्या रेव्ह पार्टीचे वृत्त एनसीबीला आधीचं माहित होते. मागील १५ दिवसांपासून एनसीबीची टीम या ऑपरेशनची तयारी करत होती. शनिवारी सकाळी २० ते २२ अधिकाऱ्यांची टीम सर्च वॉरंट घेऊन एनसीबी ऑफिसहून निघाली.
सर्व अधिकारी साध्या कपड्यांमध्ये होते. ते पार्टीत सहभागी झाले. परंतु, पार्टी सुरू होण्याआधी एनसीबीने चौकशी सुरू केली. अधिकारी सर्वांना खोलीत घेऊन गेले. आणि तेथे त्यांचा तपास केला. त्यावेळी ८ लोकांकडून अमली पदार्थ जप्त केले. आणि सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
८ लोकांमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यनचं नावदेखील होतं. एनसीबीने सर्वांची चौकशी केली. रविवारी दुपारी, आर्यनसह ३ आरोपींना अटक केली. प्रतिबंधित पदार्थांची विक्री, विक्री आणि खरेदी करणे या आरोपांखाली त्यांना अटक झाली.
एनसीबीनुसार, त्यांच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या, १ लाख ३३ हजार रुपये मिळाले होते.