आर्यन खानचा जुना व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कमेन्टचा पाऊस

आर्यन खानचा जुना व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कमेन्टचा पाऊस
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन :  क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (वय २३) याच्यासह ८ जणांना अटक केली. आर्यनसह त्याचे मित्र अभिनेता अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमून धमेचा याला कोर्टासमोर उभे केल्यानंतर एक दिवसाची एनसीबीने पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान आर्यन शाहरुख खान याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

नुकतेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा एक जुना व्हिडिओ त्याच्या इंन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आर्यन स्टंट करत असून तो शर्टलेस दिसत आहे. हा व्हिडिओ त्याने नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे, ३१ डिसेबर २०१३ मधील आहे.

यात आर्यनने एका टेबलवरून उंच उडी घेतल्याचे दिसत आहे. यावेळी आर्यनसोबत त्याचे काही मित्रदेखील दिसत आहेत. हा व्हिडिओ त्याची इंस्टाग्रामवरील पहिली पोस्ट आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांकडून कमेन्टचा पाऊस पडत आहे. यात एका युजर्सने 'आर्यन मद्यधुंद अवस्थेत उड्या मारत आहे'. तर दुसऱ्या एकाने 'आर्यन नशा करण्यापूर्वीचा जोशमध्ये आहे' असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने 'गांजा खावून तो इतका सडपासळ आहे' असे म्हटले आहे. याशिवाय अनेक युजर्सनी वेगवेगल्या कॉमेन्टस देत त्याची खिल्ली उडवली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टीची गुप्त माहिती आधीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. या माहितीच्या आधारे NCB च्या टीमने शनिवारी सकाळी २० ते २२ अधिकाऱ्यांचे पथक साद्या वेशात रेव्ह पार्टीत पोहोचले. या पार्टाच्या सुरूवातीलाच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान ८ व्यक्तीकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नावही या ८ लोकांमध्ये समाविष्ट आहे. एनसीबीने प्रथम या सर्वांची चौकशी केली आणि त्यानंतर रविवारी (दि.४) रोजी दुपारी आर्यनसह ३ आरोपींना अंमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि खरेदीमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली अटक केली.

आरोपींकडून अमंली पदार्थासह १.३३ लाख रुपये जप्त

एनसीबीच्या माहितीनुसार, या आरोपींकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या याशिवाय १.३३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यानंतर तिन्ही आरोपींना मुंबईच्या फोर्ट कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना एनसीबीने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर ५ आरोपींनाही NCB ने अटक केली.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news