Delhi Airport : महाराष्‍ट्र ‘एसटीएस’कडून बांगलादेशी नागरिकाला अटक | पुढारी

Delhi Airport : महाराष्‍ट्र 'एसटीएस'कडून बांगलादेशी नागरिकाला अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून युएई येथून दिल्लीत आलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या. इर्शाद शहाबुद्दीन शेख (33) असे या आरोपीचे नाव असून ‘एटीएस’ने त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. (Delhi Airport ) दिल्‍ली विमानतळावर ही कारवाई करण्‍यात आली.

मालिपोडा येथील रहिवासी

बांगलादेशमधील मालिपोडा येथील रहिवासी असलेल्या एका नागरिकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट तयार केला हाेता. याच पासपोर्टच्या आधारे तो विमानाने युएई येथून दिल्लीत (Delhi Airport) येणार असल्याची माहिती राज्य एटीएसला मिळाली होती.

दिल्ली विमानतळावर सापळा रचून कारवाई

त्यानुसार एटीएसच्या पथकाने दिल्ली विमानतळावर सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याला मुंबईत आणून याप्रकरणी गुन्हा दाखल करत एटीएसने त्याला अटक केली आहे.

न्यायालयाने शेख याला (दि. ०८) ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

Back to top button