Gold Price : सणासुदीत सोने आणखी होणार स्वस्त

Gold Price : सणासुदीत सोने आणखी होणार स्वस्त
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात (Gold Price) चढ-उतार सुरुच आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल शुक्रवारी (दि.१ ऑक्टोबर) सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४६,४३४ रुपये होता. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती.

दरम्यान, शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात ०.०५ टक्के घसरण झाली होती. एमसीएक्सवर डिसेंबर डिलिव्हरी सोन्याचा दर ४६ हजारांवर जाऊन बंद झाला होता. एकूणच सप्टेंबर महिन्यात एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत ४ टक्के घसरण झाली. त्याआधी ऑगस्ट महिन्यात सोने दरात २.१ टक्के घसरण झाली होती.

Gold Price Today
Gold Price Today

दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात MCX वर सोन्याचा दर ४५ हजारांपर्यंत (प्रति १० ग्रॅम) खाली येऊ शकते, असा अंदाज कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या दरांवर डॉलर मजबुतीचा दबाव (Gold Price update)

अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने सध्या सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे ऑक्टोबरच्या मध्यावधीनंतर सोन्याच्या किमतीत (Gold Price) सुरु असलेली घसरण थांबू शकते, असेही संकेत कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांनी दिले आहेत.

काही दिवसांत भारतात सणासुदीचे दिवस सुरु होतील. सणासुदीच्या काळात सोन्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरावर नजर मारल्यास सध्या दर खाली आले आहेत. पण डॉलर कमकुवत झाल्यास सोन्याचे दर पुढील महिन्यात वाढू शकतात, असे संकेत कमोडिटी तज्ज्ञांनी दिले आहेत.

दरम्यान, चांदीचा सध्याचा दर प्रति किलो ५९,५८१ रुपये आहे.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं.. | Swami Motors |Pre-owned Cars

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news