Gold Rate Today : सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव | पुढारी

Gold Rate Today : सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Gold Rate Today : सोन्याच्या दरात चढ- उतार सुरुच आहे. सराफा बाजारात आज बुधवारी सोने- चांदी दरात काही प्रमाणात तेजी दिसून आली. सोन्याचा दर मंगळवारच्या (दि.२८) तुलनेत बुधवारी (दि.२९) प्रति १० ग्रॅममागे २८१ रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलोमागे २२४ रुपयांनी महागली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Rate Today बुधवारी २९ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,२३८ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,०५३ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,३५४ रुपये, १८ कॅरेट ३४,६७९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,०४९ रुपये होता.

चांदीचा प्रति किलो दर ५९,८५२ रुपये होता.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर ४६ हजारांवर होता. मात्र, २८ सप्टेंबर रोजी ४५ हजार ९०० रुपयांपर्यंत दर खाली आली होता. त्यात आता तेजी दिसून येत आहे.

मागील एक वर्षातील सोन्याच्या किमतीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षी २०२० मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५६,१९१ रुपयांवर पोहोचला होता. तर सप्टेंबर २०२१ मध्ये सोने ४६ रुपयांपर्यंत खाली आले. सध्याचा दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Manike mage hithe Marathi Version : व्हायरल Manike ला मराठी तडका – apurva naniwadekar

Back to top button