‘अदानी’ च्या मुद्द्यावर ‘आप’ची भाजप मुख्यालयासमोर निदर्शने | पुढारी

'अदानी' च्या मुद्द्यावर 'आप'ची भाजप मुख्यालयासमोर निदर्शने

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा – अदानी उद्योग समुहावर झालेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत, या मागणीसाठी आम आदमी पक्षाने रविवारी भाजप मुख्यालयासमोर निदर्शने केली.

गेल्या 24 जानेवारी रोजी अमेरिकेची शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्गने अदानी समुहावर गंभीर आरोप केले होते. अदानी समुहाच्या चौकशीपासून भाजप दूर पळत असली तरी आम्ही गप्प बसणार नाही, असे आप नेते गोपाल राय यांनी आंदोलनस्थळी सांगितले. ‘कोणत्याही तपासाला न घाबरणारे एकच नेते आहेत आणि ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल’ असेही राय म्हणाले. अदानी समुहाच्या चौकशीचा मुद्दा मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी संसदेतही उचलून धरलेला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button