Delhi-Mumbai Expressway : पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन | पुढारी

Delhi-Mumbai Expressway : पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचे (Delhi-Mumbai Expressway) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (दि.१२) करण्यात आले. १ हजार ३८६ किलोमीटरचा द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा २४६ किलोमीटर लांबीचा आहे. दिल्ली-दौसा-लालसोट या महामार्ग पूर्ण झाल्यामुळे दिल्ली ते जयपूर ५ तासांऐवजी केवळ साडे तीन तासांमध्ये पोहचता येईल.

सुमारे १२ हजार १५० कोटी रुपयांच्या निधीतून या टप्प्याचे बांधकाम करण्यात आले. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे चा (Delhi-Mumbai Expressway) पहिला टप्पा संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्‍हटले आहे. एक्सप्रेस-वे च्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान दौसा येथील १८ हजार १०० कोटींच्या प्रस्तावित योजनांची घोषणा करण्यात आली.

एक्सप्रेस-वे पूर्ण झाल्‍यानंतर दिल्‍ली-मुंबई प्रवास १२ तासांवर येणार

१ हजार ३८६ किलोमीटर लांब दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेमुळे दोन्ही शहरातील अंतर १२ टक्क्यांनी कमी होईल. महामार्गामुळे १ हजार ४२४ किलोमीटरचे अंतर १ हजार २४२ किलोमीटरपर्यंत येईल. सध्या दिल्लीवरुन मुंबईला पोहोचण्यासाठी २४ तास लागतात. एक्सप्रेस-वे मुळे अवघ्या १२ तासांमध्ये हे अंतर कापता येईल.

एक्स्प्रेस-वेला किती खर्च आला ?

९ मार्च २०१९ रोजी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाची पायाभरणी करण्यात आली. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा २४६ किमीचा दिल्ली-दौसा-लालसोट टप्पा १२,१५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा टप्पा सुरू झाल्यामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ ५ तासांवरून ३.५ तासांवर आला आहे. तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाल्याचा दावाही सरकारने केला आहे. १ हजार ३८६ किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे ९८ हजार कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.

Delhi-Mumbai Expressway : महामार्गावर हेलीकॉप्टर सुविधा देण्याचा विचार

दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्रातून हा महामार्ग जाईल. यासोबतच कोटा, इंदुर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत सारख्या प्रमुख शहरांना देखील जोडेल. एक्सप्रेस-वे वर हॉटेल, रेस्टोरेंट, रुग्णालय, फूड कोर्ट, पेट्रोल पंपाची सुविधा प्रवाशांना मिळेल. यासोबत जागोजागी पार्किंगची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. भविष्यात या मार्गावर हेलीकॉप्टर सुविधा देण्याचाही विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा 

Back to top button