पुढारी ऑनलाईन डेस्क : बंजारा समाज आणि भटक्या विमुक्तांसाठी महामंडळ स्थापन केले जाईल, अशी ग्वाही आज देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे आणि मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील अडीच वर्ष बंजारा समाजासाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. आमच्या सरकारमध्ये बंजारा समाजासाठी तिजोरी खुली आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर ५९३ कोटी रुपयांचा निधी दिला. या पुढेही समाजाच्या विकासासाठी नव्या योजना तयार करण्यात येतील. आम्ही बंजारा समाजाचा कायापालट करणार आहोत. पोहरागडावर लवकरचं रेल्वे मार्ग करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस या वेळी सांगितले.
सेवालाल महाराज हे लढवय्ये होते. त्यांनी आपल्याला लढायला शिकवले. महाराजांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. सेवालाल महाराजांच्या २२ प्रतिज्ञांचा संपूर्ण जगाने स्वीकार केला आहे. सेवालाल महाराजांचे कार्य आम्ही पुढे नेणार आहोत, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.