नियतीचा घाला ! ९०० किलोमीटर लांब तरीही जुळ्या भावंडांची काही तासांच्‍या अंतराने ‘एक्‍झिट’ | पुढारी

नियतीचा घाला ! ९०० किलोमीटर लांब तरीही जुळ्या भावंडांची काही तासांच्‍या अंतराने 'एक्‍झिट'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जुळी भावंडे म्‍हटलं की, एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू. इतकं त्‍याचं नातं घट्ट असतं. आईच्‍या गर्भात ९ महिने एकत्र वास्‍तव्य केल्‍यानंतर काही मिनिटांच्‍या फरकांनी दोघांचा जन्‍म होतो. त्‍यामुळेच जुळ्यांमधील निस्‍सीम प्रेमाची ‘नाळ’ जन्‍मभर कायम राहते, असे मानले जाते. आजवर तुम्‍ही जुळ्या भावंडांच्‍या प्रेमाच्‍या आणि त्‍यांच्‍यामधील असणार्‍या विलक्षण साम्‍याविषयीच्‍या अनेक गोष्‍टी ऐकल्‍या किंवा वाचल्‍या असतील. मात्र ९०० किलोमीटर दूर असूनही जुळ्या भावंडांचा काही तासांच्‍या अंतराने झालेला मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. (Rajasthan twins die )

याप्रकरणी टाईम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्‍या वृत्तानुसार, “सुमेर आणि सोहन ही जुळी भावंडे ही राजस्‍थान राज्‍यातील बाडमेरमधील सिंधरा येथील. दोघांनी एकत्र शिक्षण पूर्ण केले. यानंतर सुमेर हा गुजरातमधील सुरत येथे एका कापड कंपनीत काम करत होता. तर सोहन हा जयपूरमध्‍ये शिक्षक भरतीच्‍या परीक्षेची तयारी करत होता.

९०० किलोमीटर दूर तरीही काही तासांच्‍या अंतराने मृत्‍यू…

बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सुरत येथील वास्‍तव्‍यास असणारा सुमेर हा टेरेसवर बोलत उभा होता. अचानक तोल जाऊन तो कोसळला. उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला. सुमेरच्‍या मृत्‍यूची माहिती मिळताच सोहन हा जयपूरहून घरी आला. संपूर्ण घरावर शोककळा पसरली असतानाच काही तासांनी म्‍हणजे गुरुवारी पहाटे पाण्‍याच्‍या टाकीत पडून सोहनचा दुर्दैवी अंत झाला. दोन्‍ही मुलांचाही काही तासांच्‍या अंतराने मृत्‍यू झाल्‍याने कुटुंबाला मोठा मानसिक धक्‍का बसला आहे.

Rajasthan twins die : सोहनने जीवन संपविल्‍याचा पोलिसांचा संशय

सुमेरचा आकस्‍मिक झालेल्‍या मृत्‍यूचा सोहनला मोठा मानसिक धक्‍का बसला असवा. त्‍यामुळे त्‍याने आपलं जीवन संपवले असावे, असा संशय बाडमेरमधील सिंधरा पोलीस ठाण्‍याचे अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी व्‍यक्‍त केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे, असेही सुरेंद्र सिंह यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button