

पुढारी ऑनलाइन डेस्क : Adidas VS Thom Browne : 'आदिदास' या जागतिक नामांकित स्पोर्ट्सवेअर ब्रँडने लक्झरी डिझायनर थॉम ब्राउन विरुद्धची स्ट्राइप ट्रेडमार्कची लढाई गमावली आहे. न्यूयॉर्कच्या ज्युरींनी अदिदासचा दावा फेटाळत ब्राउनच्या बाजूने निर्णय दिला.
'आदिदास' हा जागतिक पातळीवरील नामांकित स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे. तसेच तीन पांढ-या पट्ट्या हा त्याचा ट्रेड मार्क आहे. तर थॉम ब्राउन हा लक्झरी डिझायनरमधील मोठा ब्रँड आहे. थॉम ब्राऊनचा ट्रेडमार्क हा चार पट्ट्यांचा आहे. 'आदिदास'ने याला आक्षेप घेत न्यूयॉर्क न्यायालयात थॉम ब्राउन विरुद्ध जवळपास 63 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता.
Adidas VS Thom Browne : 'आदिदास'ने आपल्या दाव्यात म्हटलं होते की, थॉम ब्रॉऊनचा चार पट्ट्यांचा ट्रेडमार्क हा त्यांच्या तीन टप्प्यांच्या ट्रेडमार्कशी खूप जास्त मिळता जुळता आहे. त्यामुळे ग्राहकांची गल्लत होऊ शकते, असे म्हणत थॉम ब्राउनच्या ट्रेड मार्कवर दावा ठोकला होता.
न्यायालयाने 'आदिदास'चा दावा फेटाळताना म्हटले आहे की, 'आदिदास'च्या डिझाइनमध्ये तीन पट्टे हे एक सामान्य वैशिष्ट्य आहे तर ब्राउनच्या निर्मितीत रचनात्मक वैशिष्ट्य आहे. चार आडव्या, समांतर पट्ट्या ज्या कपड्याच्या बाहीला गोल असतात. Adidas VS Thom Browne : थॉम ब्राऊनच्या वकिलांनी कोर्टाच्या दस्तऐवजांमध्ये युक्तिवाद केला होता की, ब्रँडच्या ग्रॉसग्रेन सिग्नेचर—एक लाल, पांढरा आणि निळा रेषेचा नमुना डिझाइन, ज्यावर ब्राऊनच्या टीमने पाच पट्टे वैशिष्ट्यीकृत आहेत. तर अदिदासचे पट्टे हे सामान्य तीन स्ट्रेप्स आहेत.
थॉम ब्राउनचे वकील रॉबर्ट मालडोनाडो यांनी गुरुवारी क्लोजिंग युक्तिवाद करताना युक्तिवाद केला की अदिदास पट्ट्यांवर स्वतःचा हक्क सांगू शकत नाही, असे ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच 'आदिदास'ने दावा केला होता की, थीम ब्राऊनने ॲक्टिववेअर स्ट्रीप डिझाइनचा वापर केल्याने ग्राहकांना गोंधळात टाकून लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.यावर थॉम ब्राऊनने युक्तिवाद केला की, त्यांचे ब्रँड वेगवेगळ्या बाजारपेठेत आणि उत्पादनांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होण्याची शक्यता नाही.
Adidas VS Thom Browne : दोन्ही कंपन्यांमधील ट्रेडमार्कवरुन सुरु असणारा वाद सुमारे 15 वर्षे इतका जुना आहे. यापूर्वी 2005 मध्ये देखील झाली होती. ब्राउन ब्रँडने "थ्री-बार सिग्नेचर" म्हणून ओळखल्या जाणार्या तीन-स्ट्रीप डिझाइनची विक्री करण्यास सुरुवात केली. साधारण दोन वर्षांनंतर, Adidas या ब्रँडशी डिझाईनबद्दल संपर्क साधला आणि थॉम ब्राउनने कोर्टाच्या कागदपत्रांचा हवाला देऊन CNN नुसार ते वापरणे थांबवण्याचे मान्य केले. यानंतर 2008 आणि 2009 मध्ये "फोर-बार सिग्नेचर" लूक उपलब्ध झाला.
Adidas म्हणाले की, 2018 मध्ये जेव्हा थॉम ब्राउनने "ग्रोस्ग्रेन स्वाक्षरी" ट्रेडमार्कसाठी अर्ज केला तेव्हाच संभाव्य ट्रेडमार्क उल्लंघनाची जाणीव झाली. त्यानंतर 2021 मध्ये अदिदासने थॉम ब्राउनवर दावा ठोकत नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, न्यूयॉर्कच्या 8 ज्युरीच्या बेंचने अदिदासचा दावा फेटाळत थॉम ब्राउनच्या बाजूने निर्णय दिला. अशी माहिती फोर्ब्सने दिली.
'आदिदास'च्या प्रवक्त्याने फोर्ब्सला सांगितले की, या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत. कोणतेही योग्य अपील दाखल करण्यासह त्याच्या "बौद्धिक संपत्तीची दक्षतेने अंमलबजावणी" करणे सुरू ठेवेल.
Adidas VS Thom Browne : थॉम ब्राऊन व्यतिरिक्त पोलो राल्फ लॉरेन, 2005 मध्ये एबरक्रॉम्बी आणि फिच आणि 2017 मध्ये फॉरएव्हर 21 यासह इतर अनेक ब्रँडवर संभाव्य ट्रेडमार्क उल्लंघनासाठी दावा दाखल केला आहे.