PM Modi’s Cabinet Expansion | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिपद, राज्यमंत्री पद मिळणार? | पुढारी

PM Modi's Cabinet Expansion | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिपद, राज्यमंत्री पद मिळणार?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (PM Modi’s Cabinet Expansion) शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत विचारमंथन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत भेटी घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक तास चाललेल्या या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच संघटन महासचिव बीएल संतोष उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळासह राज्य तसेच केंद्रीय संघटनात्मक रचनेतही महत्वाचे बदल केले जातील. बदलाची ही प्रक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापासून सुरू होईल, असे बोलले जात आहे.

यापूर्वी नड्डा यांच्या कार्यकाळाला एक वर्षांचा विस्तार देण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात संघटनात्मक बदल, आवश्यक नेतृत्व परिवर्तन तसेच केंद्रीय पातळीवर महत्वपूर्ण संघटनात्मक बदल केले जातील. १५ फेब्रुवारीपर्यंत हे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी मोदी मंत्रिमंडळाचा हा शेवटचा विस्तार असल्याने व्यापक स्तरावर यासंदर्भात विचारमंथन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विस्ताराच्या माध्यमातून राज्यांच्या राजकीय समीकरणच्या अनुषंगाने मोठे बदल केले जातील. या माध्यमातून राज्यातील राजकारण, सामाजिक समीकरण साधले जाईल. भाजप कार्यकारणीच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवर विचारमंथनाची प्रक्रिया सुरू होईल, असे बोलले जात आहे.

मित्रपक्षांना संधी मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारात यंदा मित्रपक्षांना विशेष स्थान दिले जाईल. जनता दल (युनायटेड), अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर तसेच शिवसेना दुभंगल्यानंतर मोदी सरकार तसेच भाजप मित्रपक्षविरोधी विचाराचे असल्याचा आरोप करण्यात आले होते. अशात विस्तारात मित्रपक्षांना प्राध्यान्य दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्री मंत्रिपद?

बिहारमधे राजकीय समीकरणासाठी चिराग पासवान तसेच नितीश कुमार यांचे निकटवर्तीय राहिलेले आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच शिंदे गटाला (Shinde faction) एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्री मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात अगोदरपासून सहभागी असलेल्या मित्रपक्षाच्या मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PM Modi’s Cabinet Expansion)

हे ही वाचा :

Back to top button