महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर (Mahabaleshwar news) मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानात घसरण होऊ लागल्याने कडाक्याची थंडी महाबळेश्वर शहराची नजाकत दाखवून देत आहे. कडाक्याच्या थंडी सोबतच थंडगार वारे वाहू लागले आहेत. स्थानिकांसह पर्यटक महाबळेश्वरमध्ये 'काश्मीर'चाच जणू अनुभव घेत आहेत. आज (शनिवार) पहाटे नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.
कडाक्याच्या थंडीमुळे मुख्य बाजारपेठेत सायंकाळी पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून आले. भौगोलिकदृष्ट्या (Mahabaleshwar news) विचार केल्यास शहरातील इमारती, उष्णता, झाडी या गोष्टी दवबिंदू गोठण्यासाठी पूरक नसतात, मात्र वेण्णालेक परिसरामधील भौगोलिक परिस्तीथी वेगळी असून, मोकळी जागा, शेती व लोकवस्तीचे प्रमाण कमी असल्याने दवबिंदू गोठण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास अडसर होत नाही. दवबिंदू आकाराने लहान असतात. पाण्याच्या सूक्ष्म कणावर थंडीने प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर दवबिंदूत होते.
महाबळेश्वर (Mahabaleshwar) सोडून पंधरा ते वीस किमी खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरक पर्यटनास आलेले पर्यटक येथे अनुभवत आहेत.
हेही वाचा :