Gold Price Today : सोने पुन्हा स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव | पुढारी

Gold Price Today : सोने पुन्हा स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज गुरुवारी घसरण दिसून आली. सराफा बाजारात आज एक तोळे सोन्याचा भाव ४६,५०० रुपयांच्या खाली आला. काल बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी आली होती. पण आज गुरुवारी सोने पुन्हा स्वस्त झाले. २४ कॅरेट सोन्याचा भाव ३५८ रुपयांनी कमी होऊन ४६,४६८ रुपयांवर आला. चांदीही प्रति किलोमागे ४२६ रुपयांनी स्वस्त झाली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today गुरुवारी २३ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,४६८ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,२८२ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,५६५ रुपये, १८ कॅरेट ३४,८५१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,१८४ रुपये होता.

तर चांदीचा प्रति किलो भाव ६०,३६२ रुपयांवर होता. (हे दर गुरुवार (दि.२३) दुपारपर्यंतचे अपडेटेट असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)

एमसीएक्सवर सोने घसरले…

दरम्यान, एमसीएक्सवर (MCX) गोल्ड फ्यूचर्समध्ये ०.६ टक्के घट होऊन प्रति १० ग्रॅम ४६,३७७ रुपये दर होता. चांदीचा दर १ टक्क्याने कमी होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति औंस १,७६२ डॉलरवर आला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सोयाबीनचा दर पडला, शेतकरी हवालदिल

Back to top button