Corona Vaccine : राज्यांना आतापर्यंत ८० कोटी डोसेसचे वाटप

Corona Vaccine : राज्यांना आतापर्यंत ८० कोटी डोसेसचे वाटप
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Corona Vaccine : कोरोना नियंत्रणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 80.13 कोटी व्हॅक्सिन डोसेसचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली.

वाटप करण्यात आलेल्या डोसेसपैकी 4.52 कोटी डोसेस अजुनही राज्यांकडे शिल्लक आहेत. राज्यांना मोफत देण्यात आलेल्या डोसेसची संख्या 80 कोटी 13 लाख 26 हजार 335 इतकी आहे तर वापर न झालेल्या डोसेसची संख्या 4 कोटी 52 लाख 7 हजार 660 इतकी आहे.

21 जूनपासून कोरोना लसीकरण मोहिमेच्या सुधारित टप्प्याला सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून मोफत डोसेस देण्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान देशभरात आतापर्यंत 82 कोटी 65 लाख लोकांना लस देण्यात आली असल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

देशाचा कोरोनामुक्तीदर उच्चांकी ९७.७७ टक्क्यांवर

देशाचा कोरोनामुक्तीदर मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच उच्चांकी ९७.७७ टक्के नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण सर्वाधिक नोंदवण्यात आले. गेल्या एका दिवसात २६ हजार ९६४ कोरोनाबाधितांची भर पडली.

तर, ३५ हजार १६७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान ३८३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात सध्या ३ लाख १ हजार ९८९ रूग्णांवर (०.९०%) उपचार सुरू आहे. १८६ दिवसांनंतर पहिल्यांदाच सक्रिय रूग्णसंख्येत निच्चांकी नोंद घेण्यात आली आहे.

आतापर्यंत ३ कोटी २७ लाख ८३ हजार ७४१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुदैवाने कोरोनाने आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७६८ रूग्णांचा (१.३३%) बळी घेतला आहे.

बुधवारी देशाचा दैनंदिन संसर्गदर १.६९ टक्के नोंदवण्यात आला. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे ८२ कोटी ६५ लाख १५ हजार ७५४ डोस लावण्यात आले आहेत.

यातील ७५ लाख ५७ हजार ५२९ डोस मंगळवारी लावण्यात आले. केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ८० कोटी १३ लाख २६ हजार ३३५ डोस पुरवले आहे. यातील ४ कोटी ५२ लाख ७ हजार ६६० डोस अद्यापही राज्यांकडे शिल्लक आहेत.

येत्या काळात ४८ लाख डोस पुरवण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ५५ कोटी ६७ लाख ५४ हजार २८२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यातील १५ लाख ९२ हजार ३९५ चाचण्या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news