Corona : देशाचा कोरोनामुक्तीदर उच्चांकी ९७.७७ टक्क्यांवर! | पुढारी

Corona : देशाचा कोरोनामुक्तीदर उच्चांकी ९७.७७ टक्क्यांवर!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Corona : देशाचा कोरोनामुक्तीदर मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच उच्चांकी ९७.७७ टक्के नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण सर्वाधिक नोंदवण्यात आले. गेल्या एका दिवसात २६ हजार ९६४ कोरोनाबाधितांची भर पडली.

तर, ३५ हजार १६७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान ३८३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात सध्या ३ लाख १ हजार ९८९ रूग्णांवर (०.९०%) उपचार सुरू आहे. १८६ दिवसांनंतर पहिल्यांदाच सक्रिय रूग्णसंख्येत निच्चांकी नोंद घेण्यात आली आहे.

आतापर्यंत ३ कोटी २७ लाख ८३ हजार ७४१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुदैवाने कोरोनाने आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७६८ रूग्णांचा (१.३३%) बळी घेतला आहे.

बुधवारी देशाचा दैनंदिन संसर्गदर १.६९ टक्के नोंदवण्यात आला. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे ८२ कोटी ६५ लाख १५ हजार ७५४ डोस लावण्यात आले आहेत.

यातील ७५ लाख ५७ हजार ५२९ डोस मंगळवारी लावण्यात आले. केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ८० कोटी १३ लाख २६ हजार ३३५ डोस पुरवले आहे. यातील ४ कोटी ५२ लाख ७ हजार ६६० डोस अद्यापही राज्यांकडे शिल्लक आहेत.

येत्याकाळात ४८ लाख डोस पुरवण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ५५ कोटी ६७ लाख ५४ हजार २८२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यातील १५ लाख ९२ हजार ३९५ चाचण्या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील कोरोनास्थिती

दिनांक कोरोनाबाधित संसर्गदर

१) १३ सप्टें : २७,२५४ : २.२६%
२) १४ सप्टें : २५,४०४ : १.७८%
३) १५ सप्टें : ३०,५७० : १.९४%
४) १६ सप्टें : ३४,४०३ : २.२५%
५) २२ सप्टें : २६,९६४ : १.६९%

 

Back to top button