

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात (Gold Price) सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात तेजी आली असली तरी सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर अद्याप ४७ हजार रुपयांच्या खालीच आहे. काल मंगळवारी सोन्याच्या दरात (Gold Price) १२२ रुपयांची तेजी दिसून आली होती. आज बुधवारी सोने ३५८ रुपयांनी वाढले. यामुळे सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४६,८७१ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरातही तेजी आली आहे. चांदीच्या दर प्रति किलोमागे ७५४ रुपयांनी वाढला आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today बुधवारी २२ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,८७१ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,६८३ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,९३४ रुपये, १८ कॅरेट ३५,१५३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,४२० रुपये होता.
तर चांदीचा प्रति किलो दर ६०,९५४ रुपयांवर पोहोचला आहे. (हे दर दुपारपर्यंतचे अपडेटेट असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)
दरम्यान, एमसीएक्सवर (MCX) आज गोल्ड फ्यूचर्समध्ये घसरण दिसून आली. येथे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,६३३ रुपयांवर होता. तर चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत. येथे सोन्याचा दर प्रति औंस दर १,७७५ डॉलरवर आहे. डॉलरमध्ये अन्य चलनांच्या तुलनेत तेजी दिसून येत आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.
दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.