दिल्ली : धक्कादायक! शिक्षिकेने ५ वीच्या विद्यार्थीनीला पहिल्या मजल्यावरून फेकले | पुढारी

दिल्ली : धक्कादायक! शिक्षिकेने ५ वीच्या विद्यार्थीनीला पहिल्या मजल्यावरून फेकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील मॉडेल बस्ती प्राथमिक शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेतील एका शिक्षकेने ५ वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून ढकलून दिले. यामध्ये विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी गीता देशवाल या शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमसीडी शाळेतील दोन महिला शिक्षकांनी परस्पर भांडणात प्रथम पाचवीच्या विद्यार्थिनीला कात्रीने मारले. त्यानंतर तिला पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. या घटनेत मुलीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीने रुग्णालयात सांगितले की, शिक्षीकेने आधी तिला कात्रीने मारले. नंतर तिचे केसही कापण्याचे प्रयत्न केले. वर्गात काहीही केले नव्हते तरीही शिक्षीकेने फेकून दिले असल्याचे तिने सांगितले.

मॉडेल बस्ती येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने ५ वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला आधी कात्रीने मारण्यास सुरुवात केली. नंतर तिला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून ढकलून दिले. संबंधीत शिक्षिकेवर कारवाई केली आहे. विद्यार्थीनी सध्या सुरक्षित आहे.
– श्वेता चौहान, डीसीपी, मध्य दिल्ली

हेही वाचा :

Back to top button