व्हिडिओ व्हायरल : ‘बरसो रे मेघा मेघा…’ गाण्यावर ‘सुधा मूर्ती’ थिरकल्या | पुढारी

व्हिडिओ व्हायरल : 'बरसो रे मेघा मेघा...' गाण्यावर 'सुधा मूर्ती' थिरकल्या

पुढारी ऑनलाईन : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या ‘बरसो रे मेघा मेघा…बरसो रे मेघा मेघा…बरसो’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओत त्यांच्यासोबतचे लोक देखील मनमुरादपणे या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. मूर्ती यांच्या व्यक्तीमत्त्वातील या बिनधास्त कृतीचे नेटकरीदेखील भरभरून कौतुक करत आहेत.

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष, उत्तम शिक्षिका अन् नावाजलेल्या लेखिका असलेल्या सुधा मूर्ती यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर त्यांचे फॉलोअर्स आणि नेटकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. सुधा मूर्ती यांना फॉलो करणाऱ्या दुर्गा लवान्या यांनी या व्हिडिओवर म्हटले आहे की, ‘तुमच्यापासून खूप काही शिकायला मिळत आहे, मॅडम. तुमच्या आतमध्ये एक अद्भुत लहान मुल आणि जबाबदारी असलेल्या आईची परिपक्वता या दोन्ही गोष्टी आहेत. ईश्वराने तुम्हाला सर्वोच्च उर्जेसोबत, मोठ्या प्रमाणात आशिर्वाद देखील दिला आहे. या आशिर्वादाचा योग्यरित्या उपयोग करणाऱ्या तुम्ही लाखात एक आहेत. सुधा मूर्ती यांच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद आणि कौतुक होत आहे.

सुधा मूर्ती यांना त्यांच्या सामाजिक कारणासाठी २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे याठिकाणी टेल्को कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख नारायण मूर्ती यांच्याशी झाली. यानंतर या दोघांनीही लग्न केले. या दोघांना अक्षता आण् रोहन ही दोन मुले आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या यशाचा प्रमुख स्तंभ मानल्या जातात.

हेही वाचा:

Back to top button