Gold Price : सोन्याची झळाळी उतरली, चांदीही स्वस्त!

Gold Price : सोन्याची झळाळी उतरली, चांदीही स्वस्त!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण सुरुच आहे. सराफा बाजारात आज सोमवारी (दि.२०) २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,१८५ (प्रति १० ग्रॅम) रुपयांवर आला. तर चांदीचा दरही प्रति किलोमागे १,२५६ रुपयांनी घसरला.

दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price सोमवारी २० सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,१८५ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,००० रुपये, २२ कॅरेट सोने ४२,३०५ रुपये, १८ कॅरेट ३४,६३९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,०१८ रुपये होता.

तर चांदी प्रति किलो ५९,८७५ रुपये होती. १७ सप्टेंबर रोजी चांदीचा दर ६१,१३१ रुपयांवर होता. त्यात आज सोमवारी १,२५६ रुपयांची घसरण दिसून आली. (हे दर दुपारपर्यंतचे अपडेटेट असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)

एमसीएक्सवर (MCX) सोने घसरले

एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दर घसरले आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात ०.१३ टक्के घसरून होऊन ते प्रति १० ग्रॅम ४५,९२८ रुपयांवर होते. तर चांदीच्या दरात १ टक्के घसरण होऊन प्रति किलो ५९,४२७ रुपये एवढा दर होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा सोन्याचा दर १० हजार रुपयांनी कमी आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याने (Gold Rates) प्रति तोळा ५६,१९१ रुपयांचा स्तर गाठला होता. एक वर्षानंतर सोने ४६ हजार रुपयांवर आले आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

सोन्याचे दर का उतरले…

गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा सोन्याचा दर १० हजार रुपयांनी कमी आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट २०२० रोजी सोन्याने (Gold Rates) प्रति तोळा ५६,१९१ रुपयांचा स्तर गाठला होता. एक वर्षानंतर सोने ४६ हजार रुपयांवर आले आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनात सुधारणा दिसून येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या (Gold Rates) दरावर दबाव वाढला असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मन उडू उडू झालं अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत बरोबर गणपती मूर्ती बनवण्याची स्पर्धा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news