गुजरातने पोकळ आश्वासनांच्या राजकारणाला नाकारलं: अमित शहा | पुढारी

गुजरातने पोकळ आश्वासनांच्या राजकारणाला नाकारलं: अमित शहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निडवणुकीचा निकाल हा भूतपूर्व जनादेश’ असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्‍हटलं आहे.

गुजरात विधानसभा निडवणुकीचा निकालानंतर अमित शहा यांनी टिव्ट केले आहे की,  ‘गुजरातने रेवडी वाटप आणि तुष्टीकरणाचे राजकारण खोट्या आश्वासनांच्या राजकारणाला नाकारून भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे.‘या प्रचंड विजयाने हे दाखवले आहे की, प्रत्येक  वर्ग मग तो महिला असो वा युवा किंवा शेतकरी सर्व मनाने भाजपासोबत आहेत.’

गुजरातने नेहमी इतिहास रचला आहे. मागील दोन दशकात मोदीजींच्या नेतृत्वात भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देऊन सर्व रेकॉर्ड तोडले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास मॉडलमध्ये जनतेच्या अतुट विश्वासाचा विजय आहे.’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

अमित शहा यांनी भाजपाच्या विजयानंतर जनतेचे आभार मानत नमन केले आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘या ऐतिहासिक विजयानंतर गुजरातच्या जनतेला नमन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मिळालेल्या भव्य विजयावर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेश अध्यक्ष सीआर पाटील आणि अथक परिश्रम करणारे गुजरात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा.’

 

Back to top button