Himachal Pradesh Election Result 2022 : कोण असतील हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री? | पुढारी

Himachal Pradesh Election Result 2022 : कोण असतील हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेस बहुमत मिळवणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

Himachal Pradesh Election Result 2022 : यंदाही आपल्‍या परंपरेप्रमाणे काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर केले नव्‍हते. राज्‍यात काँग्रेसने 39 जागेवर आघाडी घेतली असून, भाजपला 26 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हिमाचल प्रदेशमध्‍ये सत्ता स्‍थापन करणार हे स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार असेल तर मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरू आहे.

Himachal Pradesh Election Result 2022 : हे आहेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार

1) प्रतिभा सिंह – प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसने प्रचारादरम्यान सीएम वीरभद्र यांच्या
चेह-याचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे. त्यामुळे वारसदार म्हणून प्रतिभा सिंह सीएम पदासाठी दावा करू शकतात.

2 )सुखविंदर सिंह सुख्खू – सुख्खू हे काँग्रेसचे पूर्व प्रदेशाध्यक्ष आहेत. तर यावेळी ते प्रचार समितीचे प्रमुख होते. राहुल गांधींनी सीएम म्हणून सुख्खू पसंत आहे, असे मानले जाते. सुख्खू हमीरपूर जिल्ह्यातील नादौन सीटवरून निवडणूक लढत होते. ते विजयी झाल्यास ते चौथ्यांदा आमदार हाेतील.

3) मुकेश अग्निहोत्री – शिमलास्थित पत्रकार मुकेश अग्निहोत्री यांना एकदा नोकरीसाठी संघर्ष करावा लागला. राजकारणात आल्यानंतर मात्र त्यांनी सलग चार निवडणुका जिंकल्या, कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती. नंतर ते विरोधी पक्षनेते बनले. आता ते आमदार म्हणून पाचव्यांदा निवडणूक रिंगाणात  होते. मात्र, ६० वर्षीय अग्निहोत्री या निवडणुकीत एवढीच अपेक्षा करत आहेत असे नाही. दर पाच वर्षांनी पर्यायी सत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्येही त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रवेश केला आहे.

“अग्निहोत्री त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि सध्याच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारविरोधात तीव्र हल्ल्यांमुळे प्रचंड गर्दी खेचत आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे अपयश, भ्रष्टाचार, कथित पोलीस कॉन्स्टेबल भरती घोटाळा, बेरोजगारी आणि महागाई हे या मोहिमेचे केंद्रबिंदू आहे,” असे अग्निहोत्री यांचे उना येथील समर्थक केवल कृष्णन सांगतात.

4)  ठाकूर कौल सिंह – हिमाचल प्रदेश काँग्रेसचे कौल हे सर्वात वरीष्ठ नेते आहेत. 77 वर्षीय कौल मंडी जिल्ह्यातील दरंग सीटवरून आतापर्यंत आठ वेळा निवडून आले आहेत.  ते काँग्रेसचे पूर्व प्रदेश अध्यक्ष राहिले असून राज्य सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. त्यामुळे ते देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.

5 ) आशा कुमारी – या चंबा जिल्ह्यातील डलहौजी सीटचे सहा वेळा आमदार राहिली असून, पंजाब काँग्रेसच्या प्रभारी देखील होत्या.  त्या छत्तीसगढच्या सरकारमधील मंत्री टी.एस. सिंह देव यांच्या बहीण आहे. छत्तीसगढमध्ये अडीच-अडीच वर्षाच्या करार झाल्यानंतरही त्यांना सीएमची खुर्ची देण्यात आली नव्हती. त्याची भरपाई हिमाचलमध्ये आशा कुमारी या त्यांच्या बहिणीला सीएमपद देऊन करण्यात येईल, असे मानले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button