पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या चित्रपटाच्या बजेटचा परिणाम चित्रपटाच्या प्रभावावर होतो की नाही, हे पाहण्यासाठी एका फायनान्स कंपनीने चक्क ऑक्टोबर महिन्यात १३ हाॅरर सिनेमे (Horror Movies) पाहणाऱ्याला १३ डाॅलर बक्षिस देणार असल्याचे जाहीर केलेले आहे.
फायनान्स बझ नावाची कंपनी ही हाॅरर मुव्ही पाहताना संबंधित प्रेक्षकांच्या हृदयावर कोणते परिणाम होतात, ते पाहण्यासाठी एक व्यक्ती कामावर ठेवणार आहे. फिटबीटचा वापर करून संबंधित प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोक्यावर लक्ष ठेवणार आहे. ही व्यक्ती १३ हाॅरर मुव्हीज पाहणार आहे, अशी माहिती कंपनीने एक वृत्तपत्राला दिलेली आहे.
कंपनीचं असं म्हणणं आहे की, "जास्त बजेट असणाऱ्या हाॅरर चित्रपटांपेक्षा कमी बजेट असणारे हाॅरर चित्रपट प्रेक्षकांना किती भीती दाखवतो, हे पाहण्यासाठी फायनान्स बझमध्ये हा प्रयोग करण्यात येत आहे."
"या १३ हाॅरर मुव्हीज (Horror Movies) पाहताना प्रेक्षकाच्या हृदयाची ठोके तपासण्यासाठी जे फिटबीट नावाचं यंत्र बसवलेलं आहे, त्यातून कोणत्या मुव्हीचा आणि किती बजेटच्या परिणाम प्रेक्षकांवर जास्त होतो आहे, हे पाहिलं जाणार आहे", असंही कंपनीनं सांगितलं आहे. स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकाला ९ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान हे चित्रपट पाहायचे आहेत.
अशी आहे हाॅरर चित्रपटांची यादी