सायबर क्राईम घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी : Cyber Crime

Cyber attack
Cyber attack
Published on
Updated on

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा; तंत्रज्ञानाच्या सदुपयोगासह दुरूपयोगाचेही प्रमाण वाढले आहे. चोरटे 'स्मार्टली' नागरिकांच्या कमाईवर ऑनलाईन डल्ला मारत कोट्यवधी रुपये लुटत आहेत.  सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. २०२० मध्ये सायबर क्राईम प्रकरणी राज्यात तब्बल ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असून गेल्यावर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये २०२० मध्ये १० हजार ७४१ गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्राखालोखाल तेलंगणामध्ये ५ हजार २४ तसेच उत्तर-पूर्वेकडील आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार ५३० गुन्हे सायबर क्राईम संबंधी दाखल करण्यात आले.

एनसीआरबीच्या अहवालानूसार २०२० मध्ये सायबर क्राईमचा ग्राफ वधारल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी सायबर क्राईमचे ५० हजार ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ३० हजार १४२ गुन्हे (६०.२%) फसवणुकीसंबंधी नोंदवण्यात आले आहेत. २०१९मध्ये सायबर क्राईमच्या ४४ हजार ७३५, तर २०१८ मध्ये २७ हजार २४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान २०२० मध्ये वेब मीडियावर खोट्या बातम्यांसंबंधी ५७८ गुन्हे दाखल करण्यात आले.

महिला,बालकांवरील अत्याचारात घट

एनसीआरबीच्या अहवालानूसार २०२० मध्ये देशात महिला आणि बालकांवरील अत्याचारात घट झाल्याचे दिसून आले आहे. दैनंदिन सरासरी ७७ गुन्हे असे अत्याचाराचे एकूण २८ हजार ४६ गुन्हे २०२० मध्ये दाखल करण्यात आले.देशात २०२० मध्ये एकूण ६६ लाख १ हजार २८५ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ४२ लाख ५४ हजार ३५६ गुन्हे भारतीय दंड विधानाशी (आयपीसी) संबंधित आहेत. तर,२३ लाख ४६ हजार ९२९ प्रकरण विशेष आणि स्थानिक कायद्यांसबंधी (एसएलएल) होते.

देशात २०२० मध्ये घडलेले सायबर क्राईम

ऑनलाईन बॅंकिंग फ्राड- ४,०४७
ओटीपी फ्राड- १,०९३
क्रडिट/डेबिट कार्ड फ्राड- १,१९४
एटीएमशी संबंधित गुन्हे- २,१६०
महिला,बालकांसंबंधी गुन्हे- ९७२
डाटा चोरी-९८

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news