Time Magazine : टाइम मॅग्‍झीनच्‍या यादीत मोदी, ममतांसह अदर पुनावालाही | पुढारी

Time Magazine : टाइम मॅग्‍झीनच्‍या यादीत मोदी, ममतांसह अदर पुनावालाही

पुढारी वृत्तसेवा; न्‍यूयॉर्क : ( Time Magazine ) टाइम मॅग्‍झीनने २०२१ मधील जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्‍यक्‍तींची यादी जाहीर केली आहे. यामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्‍स्‍टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांचा समावेश आहे. टाइम मॅग्‍झीनच्‍या ( Time Magazine ) यादीत अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडन आणि चीनचे राष्‍ट्रपती शी जीनपिंग यांच्‍याही नावांचा समावेश आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे, या यादीत तालिबनाचा नेता मुल्‍ला अब्‍दुल गनी बरादर यालाही स्‍थान देण्‍यात आले आहे.

टाइमने २०२१च्‍या यादीत जगातील १०० प्रभावशाली व्‍यक्‍तींच्‍या नावाचा समावेश आहे. यामध्‍ये अमेरिकेच्‍या उपाध्‍यक्ष कमला हॅरीस, ब्रिटनचे प्रिन्‍स हॅरी, अमेरिकचे माजी अध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प, इस्‍त्रायलचे पंतप्रधान नेफ्‍टाली बेनेट, इराणचे राष्‍ट्रपती इब्राहिम इइसी, टेस्‍लाचे सीईओ एलन मस्‍क यांच्‍या नावाचा समावेश आहे.

टाइमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख देताना म्‍हटले आहे की, एकस्‍वतंत्र राष्‍ट्र असणार्‍या भारतामध्‍ये मागील ७४ वर्षांमध्‍ये जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्‍या नंतर नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक प्रवाभशाली नेते आहेत.

मोदी आणि ममता बॅनर्जींबद्‍दल व्‍यक्‍त केले मत

टाइमने परिचय करुन देताना ‘सीएनएन’चे पत्रकार फरीद जकारिया यांनी पंतप्रधान मोदींवर टीकाही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील मुस्‍लीम अल्‍पसंख्‍यांकाचा अधिकार संपुष्‍टात आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. तसेच माध्‍यम प्रतिनिधींना धमकी देत आहेत, असा आरोप जकारिया यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांचा परिचय करुन देताना म्‍हटले आहे की, ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेतृत्‍व करत नाहीत. तर त्‍या स्‍वत:च पक्ष आहेत.

रस्‍त्‍यावर उतरुन विरोधकांशी संघर्ष करण्‍याची तयारी आणि पितृसत्ताक संस्‍कृतीमध्‍ये स्‍वत;ची वेगळी ओळख निर्माण करणे हीच ममता बॅनर्जी यांना प्रभावशाली व्‍यक्‍ती बनवते, असेही टाइममध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

पूनावाल यांच्‍यावर स्‍तुतिसुमने

टाइम मॅग्‍झीनच्‍या प्रभावशाली व्‍यक्‍तींची यादीत सीरम इन्‍स्‍टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांचा समावेश आहे.

त्‍यांच्‍या परिचय करुन देताना टाइमने म्‍टहले आहे की, कोरोना महामारी काळाच्‍या सुरुवातीपासून कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करण्‍याचा प्रय्‍तन केला.

अद्‍याप कोरोना महामारी संपुष्‍टात आलेली नाही. पूनावाला कोरोना महामारी संपुष्‍टात आणण्‍यासाठी मदत करु शकतात.

हेही वाचलं का ?

 

Back to top button