wax light factory fire : स्पार्क मेणबत्त्या बनविणार्‍या कारखान्याला भीषण आग, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी | पुढारी

wax light factory fire : स्पार्क मेणबत्त्या बनविणार्‍या कारखान्याला भीषण आग, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पुणे/किरकटवाडी/खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : नांदेडफाटा येथील इंडस्ट्रीयल भागात असलेल्या वाढदिवसा दिवशी वापरल्या जाणार्‍या स्पार्किंग करणार्‍या मेणबत्त्या बनविण्याच्या कारखान्याला स्पार्किंग पावडर वजन करताना अचानक लागलेल्या आगीत एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी सकाळी घडला. (wax light factory fire)

अपघातात मृत्यू झालेल्याचे तसेच जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. आग पूर्णपणे विझविण्यात आली असून पुन्हा आग (wax light factory fire) लागू नये यासाठी सात अग्निशमन गाड्या घटनास्थळी थांबून आहेत.

सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी अग्निशमन दलाला नांदेड फाट्यापासून सर्वे नंबर १४ मधील इंडस्ट्रीयल भागात असलेल्या एका कंपनीला भीषण आग लागल्याचा फोन अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले. नांदेड येथील इंडस्ट्रीयल भागात भाऊ इंडस्ट्रीज हा वाढदिवसाठी स्पार्किंग करणार्‍या मेणबत्त्या बणविण्याचा कारखाना आहे.

सुमारे ५ गुंठ्यात हा कारखाना आहे. या ठिकाणी फटाक्यासाठी वापरली जाणारी दारू या मेणबत्त्यासाठी वापरण्यात येते. सकाळी कंपनीत रोजच्या प्रमाणे १८ कामगार कामावर आले होते. यावेळी स्पार्किंग पावडरचे वजन करताना दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. यात आगीचा भडका उडला.

सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आग

यामध्ये सर्व कामगारांनी उठून बाहेर पळ काढला. घटनेनंतर लागलीच अग्निशमन दलाने पाण्याचा मारा केला. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. परंतु, तीन कामगार आगीत होरपळले. त्यातील एक कामगाराचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी २ जखमी कामगारांना बाहेर काढले तर एकाचा मृतदेह यावेळी बाहेर काढण्यात आला. कंपनीने कोणतेही फायर ऑडीट केले नसल्याचे शक्यता वर्तविण्यात येत असून पुढील तपासात सर्व बाबी उघड होतील अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी थांबल्या असून आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे.

Back to top button