२४०० फूट उंच स्वर्गाची शिडी तोडण्याची योजना? | पुढारी

२४०० फूट उंच स्वर्गाची शिडी तोडण्याची योजना?

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या हवाईमधील होनोलूलू येथील तब्बल 3922 पायर्‍या असलेली एक शिडी आहे. ही शिडी व्हेल्ली ऑफ हेकूपासून लोकांना 2400 फूट उंचावर पोहोचते. स्वर्गाची शिडी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या या पर्वतीय वाटेवर चढण्यासाठी दरवर्षी हजारो लोक होनोलूलूला जातात. मात्र, हीच स्वर्गाची शिडी आता हटविण्याची योजना आखण्यात येत असल्याचे समजते.

होनोलूलूचे अधिकारी सध्या स्वर्गाची शिडी नष्ट करण्याची योजना तयार करत आहेत. या अधिकार्‍यांच्या मते, हे एक अत्यंत धोकादायक पर्यटनस्थळ आहे. गेल्या बुधवारी होनोलूलू नगर परिषदेत शिडी हटविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून एकमत झाले. स्वर्गाच्या शिडीची निर्मिती अमेरिकन लष्कराने 1942 मध्ये अँटेना लावण्यासाठी केले होते.

जेणेकरून एका बाजूने दुसर्‍या बाजूशी रेडिओ कम्युनिकेशन करणे सोपे होईल. त्यानंतर या अँटेनाला अमेरिकन कोस्टगार्डने आपल्या कब्जात घेतले होते. आजही तेथे 2 लाख वॅटचा रेडिओ अँटेना पाहता येऊ शकतो.

सुरुवातीला स्वर्गाची शिडी ही लाकडापासून त्यानंतर ती काँक्रिटची करण्यात आली. तेथील लोक सध्या या शिडीवर चढणे कायदेशीर करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकारच्या मते, या शिडीच्या देखभालीवर प्रचंड खर्च होतो, तसेच यातून कोणताच लाभ मिळत नाही. दरम्यान, अधिकार्‍यांच्या मते, ही शिडी अत्यंत धोकादायक स्थळ असले तरी आतापर्यंत तेथे एकच मृत्यू झाला आहे. सध्या ही शिडी चढल्यास एक हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येतो. तरीही गर्दी होतेच.

Back to top button