Joe Biden Celebrate Diwali : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी | पुढारी

Joe Biden Celebrate Diwali : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : प्रकाशाचा आणि तेजाचा संदेश देणारा दिवाळी सण देशभरात अपूर्व उत्साहात साजरा केला जात असतानाच अमेरिकेतही या सणानिमित्त उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी. डॉ जिल बायडेन यांनी शासकीय निवास्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. या क्षणाचे काही फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.(Joe Biden Celebrate Diwali)

जो बायडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन नागरिकांसोबत आपले शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी सणाचा आनंद लुटला. यादरम्यान दोघेही दिवाळी समारंभात उपस्थित भारतीयांमध्ये पोहोचले आणि त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यादेखील जातीने उपस्थित होत्या. यादरम्यान रंगतदार नृत्याचे सादरीकरणही करण्यात आले. (Joe Biden Celebrate Diwali)

अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करू, अशी प्रतिक्रिया कमला हॅरिस यांनी व्यक्त केली. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या स्वागत समारंभात त्या म्हणाल्या, जगभरातील एक अब्जहून अधिक लोकांसह, आपण दिवे लावू आणि वाईटावर चांगल्याचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करू. (Joe Biden Celebrate Diwali)

डोनाल्ड ट्रम्प यांच्याही शुभेच्छा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या निवासस्थानी भारतीय नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करून या सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा :

Back to top button