

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीतील इस्त्रायल दुतावास परिसरात दहशतवादी घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आलेल्या अर्लटनंतर दिल्ली पोलीस सावध झाले आहेत. नवी दिल्लीतील इस्त्रायल दुतावास परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
शनिवारपासूनच इस्त्रायल दुतावास तसेच त्याच्याशीसंबंधीत संघटनांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नवी दिल्लीत जागोजागी नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येकांची कसून तपासणी केली जात आहे. इस्त्रायल दुतावास तसेच आजूबाजूच्या परिसरावर करडी नरज ठेवली जात आहे. स्थानिक पोलिसांसह निमलष्करी दलांना सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
६ सप्टेंबरला इस्त्रायली नागरिक नववर्ष साजरे करतात. यानिमित्ताने दुतावासात इस्त्राईली नागरिकांची मोठी गर्दी होते. दुतावासात घुसून इस्त्रायली नागरिक तसेच यहुदींवर हल्ला चढवण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिस सूत्रांनी दिली आहे. हल्ल्यासंबंधी अलर्ट मिळताच तात्काळ दिल्ली पोलिसांकडून इस्त्राईल दुतावास, वाणिज्य दुतावास तसेच दुतावासातील कर्मचार्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नवी दिल्लीकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
हेही वाचलं का ?