कॅन्‍सर , क्षयरोग, उच्‍च रक्‍तदाबाच्‍या रुग्‍णांना केंद्राचा दिलासा | पुढारी

कॅन्‍सर , क्षयरोग, उच्‍च रक्‍तदाबाच्‍या रुग्‍णांना केंद्राचा दिलासा

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्तसेवा :  विविध रोगांमध्‍ये वापरण्‍यात येणार्‍या ३९ औषधांचा किंमती कमी करण्‍याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या ३९ औषधांमध्‍ये कोरोनासह कॅन्‍सर, क्षयरोग, उच्‍च रक्‍तदाबासाठी वापरल्‍या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे. या निर्णयामुळे  कॅन्‍सर, क्षयरोग, उच्‍च रक्‍तदाब असणार्‍या रुग्‍णांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने आवश्‍यक औषधांच्‍या यादीत कोरोना रुग्‍णांसाठी देण्‍यात येणार्‍या आयव्‍हरमेक्‍टीन, कॅन्‍सर रुग्‍णांना देण्‍यात येणार्‍या अजासिटीडाइन आणि प्‍लूडाराबिन, क्षयरोगांसाठी वापरले जाणारे बिडेक्‍विअलिन आणि डेलामेनिड यांच्‍यासह मधुमेह, उच्‍च रक्‍तदाबासाठी वापरल्‍या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे.

आवश्‍यक औषधांच्‍या (एनएलईएम) २०२१ यादीत ३९९ औषधांचा समावेश आहे. यामुळे ही औषध रुग्‍णांना कमी किंमतीत उपलब्‍ध होणार आहे.

१६ औषधांच्‍या किंमतीमध्‍ये वाढ

‘एनएलईएम’ २०२१मधील यादीतून १६ औषधे कमी करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे या औषधांच्‍या किंमतींमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. औषधांचा वापरावरही ‘एनएलईएम’ यादीत बदल होतात. त्‍यानुसार मागील काही दिवस ज्‍या औषधांचा वापर कमी झाला आहे. ते यादीतून वगळण्‍यात येते. तसेच ही यादी मोठी होणार नाही, याची दक्षताही घेतली जाते.

हेही वाचलं का ? 

पहा व्‍हिडिओ : पुण्यातील ओशो आश्रमाचा गैरव्यवहार भक्तांनी आणला चव्हाट्यावर

 

Back to top button