संजय राऊत : 'मुख्यमंत्री ज्यांचा, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर' | पुढारी

संजय राऊत : 'मुख्यमंत्री ज्यांचा, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर'

आळेफाटा (जि. पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असले तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांचे सरकार असते. सरकार आपले आहे. दुसरीकडे शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, अशी टोलेबाजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील आपल्या मित्र पक्षांवर केली आहे.

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात संजय राऊत यांनी ही जोरदार बॅटिंग केली.

राऊत पुढे म्हणाले की, “राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यावर आहे. ही आपली पॉवर आहे”, दुसरीकडे शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचं महत्त्व अधोरेखित केलं.

‘खंजीर खुपसणं म्हटलं की पहिलं नावं यायचं शरद पवारांचं. मात्र आता उद्धव ठाकरेंचं येतं’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.

“चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही असे म्हणत आमचे 105 आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही.. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत”, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

तसंच चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही.. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही”, असं प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांत पाटलांना दिलं.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button