

पुढारी ऑनलाईन डेस्क : Google Doodle : गुगल कडून वेगल यांचे खास डूडल साकारण्यात आले आहे त्यांच्या विषयी जाणून घेउयात. कोरोनाच्या महामारीमुळे सगळे जग एका भीतीच्या छायेखाली आहे. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनावर जलदगतीने लस शोधण्यात आली. पण पूर्वीच्या काळी एखाद्या आजारावर लस शोधण खूप कठीण काम होते. अशा जीवघेण्या महामारीवर पहिली लस शोधण्याचे काम पोलंडचे संसर्गतज्ञ रूडॉल्फ स्फीफन वेगल यांनी केले. रूडॉल्फ वेगल यांच्या १३८ वी जयंती निमित्त आज गुगलने अनोखे डूडल साकारून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली आहे.
पोलंडचे संशोधक आणि संसर्गतज्ज्ञ असेलेले रुडॉल्फ स्फीफन वेगल यांचा जन्म 2 सप्टेंबर 1883 साली ऑस्ट्रो-हंगेरी म्हणजे सध्याच्या झेक रिपब्लिकमध्ये झाला.
रुडॉल्फ आपले शिक्षण पोलंडच्या ल्वॉ विद्यापीठात घेतलं. पोलंड मध्ये त्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास केला. १९१४ साली त्यांची नियुक्ती पोलिश आर्मीमध्ये पॅरासिटॉलॉजिस्ट म्हणून करण्यात आली. या दरम्यान युरोपमध्ये टायफस हा संसर्गजन्य जीवघेणा रोग पसरू लागला होता. वेगल यांनी या रोगाच्या प्रसाराला आळा घाालण्याचा संकल्प केला आणि त्यावर लस शोधण्याचे आव्हानात्मक काम स्वीकारले.
टायफस हा रोग रिकेट्सिया प्रोवाज़ेकी या बॅक्टेरियापासून तयार होत होता. त्यावर वेगल यांनी संशोधनाला सुरूवात केली. १९३६ साली रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी टायफस या संसर्गजन्य रोगावर प्रभावी लस शोधली.
त्याच्या नावीन्यपूर्ण संशोधनातून असे दिसून आले की उवांचा वापर प्राणघातक जीवाणू पसरवण्यासाठी केला जातो, लस तयार करण्यासाठी दशकभरापासून संशोधन करत होते. १९३६ मध्ये रूडोल्फ वीगल यांनी पहिल्या लाभार्थीला यशस्वीरित्या लसीकरण केले.
तो काळ म्हणजे जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलेला काळ होता. त्यामुळे जर्मनीने त्यांना जबरदस्तीने या लसीची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करायला सांगितली; मग रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने या लसीची निर्मिती करणारा मोठा प्लॅन्ट उभा केला.
रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी तयार केलेल्या लसीमुळे टायफसच्या संसर्गापासून लाखो लोकांचे जीव वाचले. त्यांच्या संशोधनासाठी रुडॉल्फ स्फीफन वेगल यांना तब्बल दोन वेळा नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले हाेते.
हेही वाचलं का ?