ऑनलाईन गेम खेळण्‍यास चीनमध्‍ये केवळ तीन तासांचीच मुभा | पुढारी

ऑनलाईन गेम खेळण्‍यास चीनमध्‍ये केवळ तीन तासांचीच मुभा

बिजींग :पुढारी ऑनलाईन; ऑनलाईन गेम आणि सेलिब्रिटी याचा चीनी संस्‍कृतीला धोका आहे. यामुळे ऑनलाईन गेम आणि सेलिब्रिटी यांच्‍यावर निर्बंध आणले तरच आपली संस्‍कृती अबाधित राहिल, या मानसिकतेमधून चीनमधील सत्ताधारी कम्‍युनिस्‍ट पार्टीने निर्णय घेतला आहे.

कम्‍युनिस्‍ट पार्टीने व्‍हिडिओ व ऑनलाईन गेम संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. विद्‍यार्थी अभ्‍यासात व सर्वसामान्‍य नागरिकांचे आपल्‍या कामांमध्‍ये एकाग्रता यावी, यासाठी हा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे कम्‍युनिस्‍ट पार्टीने म्‍हटले आहे.

चीनमध्‍ये एक सप्‍टेंबरपासून अंमलबजावणी होणार्‍या नियमांमध्‍ये आता १८ वर्षांखालील मुलांना आठवड्यात केवळ तीन तासाच ऑनलाईन व्‍हिडिओ गेम खेळता येणार आहे.

मुले हीच देशाचे भवितव्‍य आहेत. मात्र ऑनलाईन गेममुळे त्‍यांच्‍या शारीरिक व मानिसक अवस्‍थेवर दुष्‍परिणाम होत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यामुळे जनहितार्थ हा निर्णय घेतला असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

भयग्रस्‍त चीनी सरकार

या निर्णयासंदर्भात आशियातील माध्‍यम अभ्‍यासक पॉल हास्‍वेल यांनी म्‍हटलं आहे की, ऑनलाइन गेम याचा राजकीय, आर्थिक आणि सांस्‍कृतिक धोरणांना धोका पोहचेल, अशी भीती चीनमधील
शी जिनपिंग सरकारला आहे. या सरकार असे वाटते की, अल्‍पवयीन मुले हे आपला बहुतांश काळ ऑनलाईन व्‍यतित करीत आहेत. त्‍यांच्‍यावर सेलिब्रिटीचा मोठा परिणाम होताे. यातून अभिव्‍यक्‍ती स्वातंत्र्यासाठी नागरिक संघटित होवू शकतात. तसे झाले तर त्‍यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल, अशी भीती चीनमधील शी जिनपिंग सरकारला आहे, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

अर्थव्‍यवस्‍थाला बसणार फटका

या निर्णयाचा ऑनलाईन गेमिंगमधील कंपन्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच मनोरंजन उद्‍योगाचेही माेठे नुकसान हाेईल. यामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागणार आहेत, अशी भीती चीनमधील उद्‍योगपती आणि अर्थशास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे.

कम्‍युनिस्‍ट पार्टीने केले निर्णयाचे समर्थन

चीनमधील आगामी काही वर्षांमध्‍ये युवकाचे अर्थव्‍यवस्‍थेमधील योगदान वाढविण्‍यावर सत्ताधारी कम्‍युनिस्‍ट पक्षाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

यामुळे ऑनलाईन गेमिंगसंदर्भात घेण्‍यात आलेल्‍या निर्णयाचे चीनने समर्थन केले आहे.

कंपन्‍यांमध्‍ये घबराट चीन सरकारचा घेतलेल्‍या निर्णयामुळे ऑनलाईन गेमिंग कंपन्‍यांमध्‍ये घबराट पसरली आहे.

माइक्रोब्‍लॉगींग प्‍लेटफॉर्म वीबो कॉर्पने फॅन क्‍लब आणि मनोरजन क्षेत्रातील हजारो अकाउंट निलंबित केले आहेत.

तसेच या प्‍लेटफॉर्मला देशातील सेलिब्रिटीची यादी जाहीर करण्‍यास मज्‍जाव केला आहे.

टेंसेंट कंपनीने आपला दररोजचा ९० मिनिटांचा ऑनलाईन गेर्मिगचा वेळ एक तास इतका केला आहे.

चीनमध्‍ये २०१९ला १८ वर्षांखालील मुलांना रात्री १० ते सकाळ ८ पर्यंत ऑनलाईन गेमिंगला बंदी घातली होती.

हेही वाचलं का? 

 

Back to top button