‘ब्लर’ : तापसी पन्नूच्या सायकोलॉजिकल थ्रीलरची जोरदार चर्चा | पुढारी

'ब्लर' : तापसी पन्नूच्या सायकोलॉजिकल थ्रीलरची जोरदार चर्चा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तापसी पन्नूचा सायकोलॉजिकल थ्रीलर ‘ब्लर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. तापसी नेहमी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासाठी ओळखली जाते. यामध्ये आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे- ‘ब्लर’.
झी स्टुडिओज, इकोलोन प्रोडक्शन्स आणि तापसीच्या ‘आउटसाइडर फिल्म्स’ द्वारा बनवलेला हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

‘ब्लर’च्‍या कथेला कोणीच नाकारू शकणार नाही. तापसी पन्नू एक प्रतिभाशाली अभिनेत्री आहे. ‘आउटसाइडर फिल्म्स, अंतर्गत या आगामी चित्रपट आणण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटातून दर्शकांना आणखी एक रोमांचक अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे.

अजय बहल दिग्दर्शित आणि तापसी आणि गुलशन देवाय्या यांचा हा चित्रपट असणार आहे. पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेला हा चित्रपट आहे. मानसशास्त्रीय थरारक चित्रपटाची कहाणी सुंदर आहे. एका अपरिहार्य परिस्थितीत अडकलेल्या मुलीची कथा आहे. त्यानंतर येणारा थरार आणि नाट्यासोबत प्रेक्षकांना येऊन भिडतो.

नैनीतालमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पार पडले आहे. सुंदर लोकेशनला मोठ्या प्रमाणावर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या टीमच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. कारण त्यांनी नुकत्याच छोट्या शहरात ‘ब्लर’चे आव्हानात्मक वेळापत्रक पूर्ण केले आहे.

नैनीतालमध्ये आपल्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी अजय बहल यांनी सागितले.

Tapsee pannu
तापसी पन्नू

दिग्दर्शक अजय बहल म्हणाले…

दिग्दर्शक अजय बहल म्हणाले, “नैनीताल लेक, मॉल रोड आणि इतर पर्यटन स्थळांसारख्या शूटिंग करणे. विशेषतः गर्दीमुळे कठीण होऊ शकते. आम्ही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत चित्रीकरण करायचो. पण, आमच्या सर्वांसाठी हा एक पूर्णपणे समाधानकारक अनुभव होता. नैनीतालने चित्रपटात सौंदर्य आणि गूढ तितकेच जोडले आहे. ”

पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिले. झी स्टुडिओज, आउटसायडर फिल्म्स, एचेलॉन प्रॉडक्शन्सचा हा चित्रपट आहे. हा एक मनोवैज्ञानिक थ्रीलरपट आहे. जो तुमच्या अंगावर शहारे आणेल. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलं का  ?

 

Back to top button