‘आप’ नेत्यांना भाजपकडून विकत घेण्याचा प्रयत्न : खा. संजय सिंह यांचा आरोप

‘आप’ नेत्यांना भाजपकडून विकत घेण्याचा प्रयत्न : खा. संजय सिंह यांचा आरोप
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पार्टीच्या नेत्यांना भाजप विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप आप नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांना २० कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप सिंह यांनी आज केला. भाजप दिल्लीतील आपचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याबाबत जे घडले ते इतर आमदारांसोबत केले जात असल्याचा दावा सिंह यांनी केला.मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आम्ही विकले जाणार नाही

"आम्ही केजरीवाल यांचे सैनिक आहोत.आम्ही विकले जाणार नाही.आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला.परंतु,आमच्या आमदारांने त्यांचे कारस्थान उघड केल्याचे संजय सिंह यावेळी म्हणाले.त्याचवेळी आपचे नेते सोमनाथ भारती यांनीही भाजपचे लोक माझ्याकडे आल्याचे सांगितले.आमच्याकडे या नाहीतर मनिष सिसोदिया यांच्यासारखी तुमची देखील अवस्था करु, असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे सोमनाथ भारती यांनी सांगितले.आप आमदार भारती यांच्यासह अजय दत्त,कुलदीप तसेच संजीव झा यांना भाजपने प्रत्येकी २० कोटींची ऑफर दिल्याचा दावा सिंह यांनी केला.

सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने ईडीकडे महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्यानंतर ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली होती. त्यामुळे सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे.याआधी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह १४ जणांविरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले होते. यामध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news