Dinosaur Footprints : दुष्काळामुळे आटलेल्या नदीपात्रात आढळले डायनासोरच्या पायांचे ठसे

Dinosaur Footprints : दुष्काळामुळे आटलेल्या नदीपात्रात आढळले डायनासोरच्या पायांचे ठसे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील टेक्सास राज्यात काही ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे येथील एका नदीपात्रात महाकाय डायनासोरच्या पायांचे Dinosaur Footprints ठसे आढळून आले आहेत. पायांच्या ठस्यांचा हा ट्रॅक आतापर्यंत सापडलेल्या ट्रॅकमधील सर्वात मोठा असून याबद्दल टेक्सास पार्क्स आणि वन्यजीव विभागाच्या स्टेफनी सॅलिनास गार्सिया यांनी खुलासा केला आहे.

टेक्सासमधील दुष्काळामुळे डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमधून वाहणारी पालुक्सी नदी The Paluxy River नदी कोरडी पडली आहे. ज्यामुळे सुमारे ११३ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या महाकाय डायनासोरच्या चालण्याने तयार झालेले ट्रॅक उघड झाले आहेत. पुन्हा पावसामुळे नदी भरून वाहू लागल्यानंतर हे ठसे पाण्याखाली झाकले जातील, पण तरीही इतके जुने ट्रॅक भविष्यासाठी जतन करून ठेवण्याचे काम आम्ही करू असे गार्सिया यांनी सांगितले.

हेही नक्की वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news