शिंदे गटाच्या आमदारांना लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी; सुप्रिया सुळेंची अमित शहांकडे मागणी | पुढारी

शिंदे गटाच्या आमदारांना लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी; सुप्रिया सुळेंची अमित शहांकडे मागणी

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी. आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरामध्ये खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांच्याबाबत हिंसक वक्तव्य करुन त्यांना धमकावण्याचे काम करत आहेत. याबाबतचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली आहे.

भाजपसोबत युती करुन सरकार चालवणार्‍या लोकांचे हे वर्तन आणि प्रतिक्रियांवर तुम्ही कारवाई करा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना शिंदे गटाच्या लोकांकडून असलेला धोका लक्षात घेता झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी विनंती खासदार सुळे यांनी ट्वीट करुन केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button