डेल्टा व्हेरिएंट नंतर आता कोरोनाचा आणखी एक नवीन अवतार | पुढारी

डेल्टा व्हेरिएंट नंतर आता कोरोनाचा आणखी एक नवीन अवतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : कोरोनाचा आणखी एक नवीन अवतार : कोरोनाच्या डेल्टा व डेल्टा प्लस प्रकाराने जगभरात खळबळ उडविलेली असतानाच आता नवा एवाय-12 प्रकाराचा विषाणू शास्त्रज्ञांना सापडला आहे. यामुळे अर्थातच शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

सुरुवातीला हा डेल्टा प्रकाराचा विषाणू असल्याचेच शास्त्रज्ञांना वाटत होते, मात्र हा एवाय- 12 प्रकारातला विषाणू असल्याचे समोर आले आहे. देशभरातील प्रयोगशाळांना यानंतर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाचा आणखी एक नवीन अवतार

कोरोना विषाणूच्या संक्रमित सॅम्पसच्या जिनोम सिक्‍वेन्सिंगदरम्यान एवाय-12 म्युटेशनवर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रयोगशाळांना सांगण्यात आले आहे.

जिनोम सिक्‍वेन्सिंगवर लक्ष ठेवणार्‍या इन्साकॉगने देखील सर्व प्रयोगशाळांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे. एवाय-12 विषाणूबद्दल शास्त्रज्ञांनादेखील फारशी माहिती नाही.

मात्र डेल्टामधून जे 12 म्युटेशन झाले आहेत, त्यातला हा प्रकार असू शकतो, असे इन्साकॉगचे म्हणणे आहे. आतापर्यंत जगभरात 33 हजार सॅम्पलमध्ये एवाय-12 ची पुष्टी झालेली आहे.

डेल्टाच्या इतर म्युटेशनमध्ये जितके सॅम्पल सापडलेले नाहीत, तितके सॅम्पल एवाय-12 म्युटेशनचे सापडले आहेत.

एवाय 12 हा डेल्टाचाच एक उपवंश असल्याचे इन्साकॉगकडून सांगण्यात आले आहे. मात्र तरीही या म्युटेशनचा लक्षपूर्वकपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. डेल्टा आणि एवाय 12 यामध्ये काही फरक आहे का, याचा विशेष अभ्यास करणे आवश्यक आहे.

दोन्ही म्युटेशनमध्ये समानता असल्याचे तूर्तास तरी दिसून आलेले आहे. 23 ऑगस्टपर्यंत आतापर्यंत देशभरात 78 हजार 865 सॅम्पलचे जिनोम सिक्‍वेन्सिंग करण्यात आले आहे.

यातील 31 हजार 124 म्हणजेच 61.2 टक्के नमुन्यात गंभीर स्वरुपाचे कोरोना विषाणू सापडले आहेत. यात 21 हजार 192 सॅम्पल डेल्टा प्रकारातले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button