विवाह समारंभाला न आलेल्या पाहुण्यांना वधूनेच पाठविले खर्चाचे बिल

विवाह समारंभाला न आलेल्या पाहुण्यांना वधूनेच पाठविले खर्चाचे बिल

लंडन : विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. यासाठी लोक अनेक दिवस तयारी करत असतात. खरेदी करणे, पाहुण्यांची यादी करणे, त्यांच्या व्यवस्थेची तयारी करणे, यासाठी वर आणि वधूच्या घरचे लोक प्रचंड धडपड करत असतात. एवढे करूनही विवाहासाठी निमंत्रित केलेले पाहुणेच जर समारंभाला आले नाहीत तर? तुम्हाला याचे निश्चितपणे वाईट वाटेल; पण तुम्ही तरी काय करू शकता, होय की नाही?

निमंत्रित करूनही पाहुणे आले नाहीत, म्हणून एका वधूने एक वेगळीच भूमिका घेतली. पाहुण्यांसाठी केलेल्या खर्चाची सरासरी काढून ते बिल सर्व पाहुण्यांना पाठवून दिले. याशिवाय ताबडतोब ते बिल भरण्याची सूचनाही केली. ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. तेथील एका वधूने आपल्या विवाहानिमित्त अनेक पाहुण्यांना निमंत्रित केले.

यासाठी प्रत्येक पाहुण्याच्या पाहुणचारासाठी सरासरी 175 युरो (सुमारे 17 हजार रुपये) खर्च केले. मात्र, निमंत्रण देऊनही पाहुणे विवाह समारंभाला आले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या वधूने खराब झालेल्या वस्तूंचा खर्च वसूल करण्यासाठी पाहुण्यांना बिलच पाठवून दिले.

या बिलामध्ये असेही नमूद करण्यात आले की, आपण विवाह अथवा स्वागत समारंभास उपस्थित राहिला नाही. अनेक जागा रिकाम्या राहिल्या. यामुळेच हे बिल आपणास पाठवण्यात येत आहे. तुम्हाला हे बिल द्यावेच लागेल. कारण, तुम्ही उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली नाही.

तुम्ही हे बिल ऑनलाईनही भरू शकता. यासाठी लवकर संपर्क साधून बिल कसे भरणार ते सांगावे. या बिलाचे छायाचित्र सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले असून, यावर आता जोरात उलट-सुलट चर्चाही सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news