रणवीरचे नग्न फोटो चालतात, मग हिजाब का नाही?; अबू आझमींचा सवाल | पुढारी

रणवीरचे नग्न फोटो चालतात, मग हिजाब का नाही?; अबू आझमींचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्या न्यूड फोटोशूटवर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी (Abu Asim Azmi) यांनी सवाल उपस्थित केले आहेत. अबू आझमी यांनी ट्विट करत म्हटले आहे की नग्न फोटो सार्वजनिक करण्याचे स्वातंत्र्य आहे, मग हिजाब का घालू नये?.

”नग्न शरीराचे प्रदर्शन करणे याला कला आणि स्वातंत्र्य म्हणतात तर एकीकडे संस्कृतीनुसार मुलीला आपल्या मर्जीने हिजाबने शरीर झाकायचे असेल तर त्याला अत्याचार आणि धार्मिक भेदभाव म्हटले जाते. आम्हाला कसला समाज हवा आहे?,” असा सवाल आझमी यांनी केला आहे. त्यांनी हे ट्विट #RanveerSingh ला टॅग केले आहे. त्यांनी ट्विट सोबत रणवीर सिंह, आमिर खान आणि मिलिंद सोमन यांचे न्यूड फोटो शेअर केले आहेत.

बंगाली अभिनेत्री आणि राजकीय नेत्या मिमी चक्रवती यांनी ट्विटरवर रणवीर सिंहच्या फोटोशूटवर मोठी पोस्ट लिहिली आहे. जर एखाद्या महिलेने असे फोटो काढले असते तर सोशल मीडियावर आणि लोकांच्या अशाच प्रतिक्रिया असत्या. कदाचित त्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली असती, असे त्याने लिहिले आहे.

मिमीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रणवीर सिंहच्या नव्या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे आणि त्यावर बहुतेक फायर इमोजी प्रतिक्रिया होत्या. आश्चर्य याचे वाटते की एखाद्या महिलेचे असे कौतुक झाले असते का? किंवा तुम्ही तिचे घर जाळून टाकाल, मोर्चा काढाल, जीवे मारण्याची धमकी द्याल.”

सध्या लिगर चित्रपटामुळे अभिनेता विजय देवरकोंडा चर्चेत आहे. सोशल मीडियावर विजयचे एक पोस्टर समोर आले होते. ज्यात तो नग्न अवस्थेत दिसला होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खाननेही असेच केले होते. आमिरच्या पीके चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो फक्त रेडिओसोबत नग्न अवस्थेत दिसत होता. सुपरमॉडेल मिलिंद सोमणनेही फोटोशूटसाठी कपडे उतरवले होते.

Back to top button