Vijay Deverkonda : विजय देवरकोंडानं केले न्यूड फोटोशूट | पुढारी

Vijay Deverkonda : विजय देवरकोंडानं केले न्यूड फोटोशूट

पुढारी आऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverkonda) एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर विजयचे चाहते दोन गटात विभागले गेले आहेत. विजयचा हा फोटो एका गटाला खूप आवडला आहे, तर दुसरीकडे त्यावर जोरदार टीका होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विजय पूर्णपणे नग्न दिसत आहे. अभिनेत्याने गुलाबाचा पुष्पगुच्छ घेत फोटोशूट केला आहे. (Vijay Deverkonda)

हा फोटो आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाशी मिळताजुळता आहे. ज्यामध्ये आमिर कपडे काढून रेडिओ हातात धरलेला दिसत होता. त्याचप्रमाणे विजयचेदेखील हा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतो. या फोटोवर लिहिले आहे- SAALA CROSSBREED.

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा प्रसार केल्यानंतर त्यांच्या आगामी ‘लायगर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. विशेषत: या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोन्ही स्टार्ससाठी हा चित्रपट खूप खास आहे. कारण ‘लायगर’ या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनन्या पांडेही या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आलीय. विजय देवरकोंडा यांची पोस्ट पाहिल्यानंतर असे मानले जात आहे की निर्माते लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करू शकतात.

चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, निर्माते जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करू शकतात. पण याच दरम्यान विजय देवरकोंडाच्या एका ट्विटने सर्व चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर ‘लायगर’चा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे, असे सर्वांना वाटत आहे.

हेदेखील वाचा –

Back to top button