मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनानंतर लगेचच नर्मदा कालवा फुटला | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनानंतर लगेचच नर्मदा कालवा फुटला

अहमदाबाद, वृत्तसंस्था ः गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते बुधवारी नर्मदा कालव्याचे उद्घाटन करण्यात आले होते आणि त्यानंतर 24 तासांत नर्मदा कालवा फुटला आहे. यामुळे गुजरातमधील भाजपा सरकारवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने टीका केली आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने नर्मदा कालवा फुटल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नर्मदा कालवा फुटल्याचे दिसत असून कालव्यातील पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे पीक नष्ट झाले आहे. महाराष्ट्र काँग्रेसनेदेखील हा कालवा फुटल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button