उत्तर प्रदेश : मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीवर घडवून आणला गॅंगरेप

 सामूहिक बलात्‍कार
सामूहिक बलात्‍कार
Published on
Updated on

उत्तर प्रदेश ; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लखीमपूर जिल्ह्यात एका तरूणीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता बहिणीनेच आपल्या सख्ख्या बहिणीचा गॅंगरेप घडवून आणल्याचा खुलासा झाल्यावर सगळेच हैराण झाले. मोठ्या बहिणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीचा गॅगरेप घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला.

लखीमपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यात एका तरूणीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला होता. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली. ही चौकशी करत असताना मृत तरूणीची मोठी बहीण घाबरलेली दिसली. पोलिसांना तिचा संशय आला. तिला ताब्यात घेवून तिला पोलिसी खाक्या दाखवताच ती घडाघडा बोलू लागली.

लखीमपूर खीरीचे एसपी संजीव सुमन यांनी सांगितले की, तिच्या मोठ्या बहिणीचे गावामधीलच चार ते पाच तरुणांशी अनैतिक संबंध होते. याची माहिती तिच्या बहिणीला लागली होती. त्यामुळे तिची लहान बहीण नेहमीच याला विरोध करत होती. सख्ख्या बहिणीशी वाद सुरू झाला. याच कारणावरून मनात राग असलेल्या मोठ्या बहिणीने आपल्या प्रियकरासोबत सोबत मिळून बहिणीने लहान बहिणीचा काटा काढण्यासाठी एक प्लॅन आखला. त्यासाठी तिने आपल्या लहान बहिणीला शेतामध्ये बोलवले.

शेतात आधीच मोठ्या बहिणीचा प्रियकर व त्याचे तीन मित्र तिथे हजर होते. त्यांनी तिच्या लहान बहिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने विरोध केला असता मोठ्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने पीडितेला पकडले व त्या चौघांनी तिच्यावर अत्याचार केला.

पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्या सर्वांनी मिळून ओढणीने लहान बहिणीचा गळा आवळून तिची हत्या केली. मोठ्या बहिणीने व त्या चार प्रियकरांनी तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकून सर्वजण तेथून पसार झाले.

पोलिसांनी कारवाई करत सात लोकांना या गॅंगरेप प्रकरणी अटक केली आहे. यात मोठ्या बहिणीसह अत्याचार करणाऱ्या चार आरोपींचा समावेश आहे आणि इतरही तीन आरोपी आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news