पिंपरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, मुलीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 20 मे ते 20 जून या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. सौरभ छगन चव्हाण (23, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षीय मुलीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, मुलीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button