सद्गुरू जग्‍गी वासुदेव म्‍हणाले, मातीच्या आरोग्याबद्दल जागरुक रहा | पुढारी

सद्गुरू जग्‍गी वासुदेव म्‍हणाले, मातीच्या आरोग्याबद्दल जागरुक रहा

कोईम्बतूर; पुढारी ऑनलाईन: भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करताना  ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्‍गी वासुदेव यांनी संदेश दिला आहे. मातीची गुणवत्ता खालावणे ही दीर्घकाळापासून दुर्लक्षित समस्या आहे. ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असा  संदेश सद्गुरू जग्‍गी वासुदेव यांनी दिला आहे.

देशासमोर अजूनही पुष्कळ आव्हाने

यावेळी सदगुरू जग्‍गी वासूदेव म्‍हणाले, हा स्वातंत्र्य दिन खूप विशेष आहे, कारण ही स्वतंत्र भारताच्या ७५ व्या वर्षाची सुरुवात आहे.

भारतानं १९४७ पासून भरपूर प्रगती केली आहे. आपण मोठी पावलं उचलली आहेत. आपण आरोग्य, उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे.

खासकरून, लाखो लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले आहे.” असे सद्गुरूंनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनी संदेशात म्‍हटले आहे.

काेराेना महामारी संदर्भात ते म्हणाले “आज आपल्‍या देशासमाेर पुष्कळ आव्हानं आहेत. या वर्षीच्या पूर्वार्धात आलेल्या काेराेनाच्‍या दुसर्‍या लाटेमुळे संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढले. मागील काही दिवसांमध्‍ये जरी रुग्‍णसंख्‍येत घट झाली असली तरी महामारीवर पूर्णपणे मात करण्यासाठी सरकारसह नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, असेही आवाहन त्‍यांनी केले.

मी सर्वांना कळकळीची विनंती करतो, भारतानं काेराेना महामारीत सुमारे ५ लाख लोकांना गमावले आहे.

जगभरात जवळपास ५० लाख लोक मृत्‍युमुखी पडले आहेत. आता तरी आपण यावर नियंत्रण मिळवता आले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

मातीची खालावणारी गुणवत्ता  हे माेठे आव्‍हान

देशातल्या मातीची खालावणारी गुणवत्ता हे आपल्‍या समाेरील माेठे आव्‍हान आहे.

यामुळे अन्न आणि पाणी टंचाई धोकादायक टप्प्याला पोहोचत आहे.

जमिनीची गुणवत्ता खालावल्यानं, भीषण संकट

चांगलं जीवन हे संपत्तीमुळे नाही तर स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, पोषक अन्न यामुळे निर्माण होतं.  गुणवत्ता खालावल्यानं जमिनी भीषण संकटात आहेत. या गंभीर प्रश्‍नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

कावेरी काॅलिंग आणि ईशा फाउंडेशनचा अनेक विविध क्षेत्रांचा सहभाग असलेला प्रकल्प  जगामधील शेतकऱ्यांनी चालवलेली सर्वांत मोठी पर्यावरणीय चळवळ आहे.

यामध्ये मातीची गुणवत्ता खालावल्याने झालेले आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या स्तरावर सहभाग आहे.

स्वयंसेवकांनी चालवलेल्या या चळवळीत, सध्या कावेरी खोऱ्यातील ९ जिल्हे आणि ५७ तालुक्यांमधल्या आणि १७८५ पंचायतीं मधल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही त्‍यांनी यावेळी दिली.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ : कोल्हापूरकरांनी जपलीय स्वातंत्र्यवीरांची रक्षा

Back to top button