वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन | पुढारी

वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन

दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचे निवेदक आणि प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.


त्यांनी झी न्यूजवर ’ताला ठोक के’ हा वादविवाद कार्यक्रम आयोजित केला होता. 2017 मध्ये ते आज तकमध्ये रुजू झाले आणि सध्या ते दंगल या चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करत होते. त्यांच्या निधनाबद्दल ट्विटरवरील त्यांच्या अनेक मित्रांनी शोक व्यक्त केला आहे. हा व्हायरस अनेक तरुण तसेच कुटुंबाना उद्ध्वस्त करत आहे, असे प्रीती गांधी यांनी म्हटले आहे. रोहित सरदाना हे हिंदी वृत्तवाहिनीत नावाजलेले पत्रकार होते. त्यांना रामनाथ गोयंका हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २०१२ साली मिळाला होता 

Back to top button